आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डिजिटल सिग्नलच्या विरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली, अॅनाॅलाॅग सिग्नल बंद करण्यास दिली अनुमती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातीलअॅनालाॅग सिग्नल केव्हाही बंद होऊ शकतात. त्यामुळे टीव्ही बघण्यासाठी सेट टाॅप बाॅक्सचीच आवश्यकता भासणार आहे. अॅनाॅलाॅग सिग्नल बंद करून डिजिटल सिग्नल सुरू करण्याची मुदत ही ३१ डिसेंबर २०१५ होती. परंतु, काहींनी याविरोधात जनहित याचिका दाखल केल्यामुळे जोवर िदल्ली उच्च न्यायालय िनर्णय देत नाही, तोवर शहरातही अॅनाॅलाॅग सिग्नल सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु, न्यायालयाने डिजिटल सिग्नलच्या विरोधातील याचिका फेटाळून लावत अॅनाॅलाॅग सिग्नल बंद करण्याची अनुमती िदल्याची माहिती व्हीडीओ काॅन्फरन्समध्ये प्रधान सचिव महसूल मनुकुमार श्रीवास्तव यांनी िदल्याचे अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
शहरात डिजिटल सिग्नल केव्हा सुरू करायचे यासंदर्भात न्यायालयाच्या आदेशाची आम्ही वाट बघत आहोत. त्यांच्या निर्देशांनुसार अॅनाॅलाॅग सिग्नल बंद केले जातील. त्यामुळे शहरात ज्यांनी सेट टाॅप बाॅक्स बसवले नाहीत त्यांना ते बसवून घ्यावे लागतील. अन्यथा टीव्ही बघता येणार नाही. ट्रायची डीजिटल अॅड्रेसेबल सिस्टिम (डीएएस) प्रणालीबाबत शिफारस तसेच माहिती प्रसारण मंत्रालय भारत सरकारच्या ११ नोव्हे.२०११ च्या अधिसुचनेप्रमाणे चौथ्या चरणात ग्रामीण क्षेत्रातील सर्व केबल जोडणी धारकांना ३१ डिसेंबर २०१६ च्या मध्यरात्रीपर्यंत सेट टाॅप बाॅक्स बसवणे अनिवार्य आहे. जाने. २०१७ पासून सेट टाॅप बाॅक्सशिवाय केबल प्रसारण िदसणार नाही. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागातील केबर जोडणी धारकांनी आपल्या केबल आॅपरेटर्सशी संपर्क साधून बाॅक्स बसवून घ्यावेत. ितसऱ्या चरणांतर्गत महानगर पालीका, नगर परिषद नगर पंचायती क्षेत्रात सेट टाॅप बाॅक्स बसवणे अनिवार्य होते. परंतु, याबाबत न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे हा िनर्णय स्थगित करण्यात आला होता. आता कोर्टाने निर्णय दिल्याचे त्यांनी सांगितले.

३१ डिसेंबरला केंद्रातूनच होणार अॅनालाॅग सिग्नल बंद
ग्रामीणभागात ३१ डिसेंबर २०१६ च्या मध्यरात्रीपासून डिजिटल सिग्नल सुरू होणार आहेत. त्यामुळे सेट टाॅप बाॅक्सशिवाय ग्रामीण भागात कोणालाही टीव्ही बघता येणार नाही. ३१ डिसेंबरला केंद्रातूनच अॅनालाॅग सिग्नल बंद केले जाणार आहेत. त्यामुळे टीव्हीवर बाॅक्सशिवाय काहीही िदसणार नाही. सेट टाॅप बाॅक्स बसवावे म्हणून ग्रामीण भागात जागृती निर्माण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, एसडीओ तहसील, तलाठी कार्यालय आपापल्या स्तरावर प्रयत्न करतील, अशी माहितीही अपर जिल्हाधिकाऱ्यांनी िदली.
बातम्या आणखी आहेत...