आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडीचा कडाका वाढला; पारा 8 अंशापर्यंत घसरला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरात काल रात्रीपासून अचानक थंडी कडाडली असून पारा अंशापर्यंत खाली घसरल्याने शहरवासीयांना हुडहुडी भरली आहे. बोचरे वारे अंगाला शहारे आणत असल्यामुळे दिवसाही लोक स्वेटर, मफलर, कानटोप्या, जर्कीन घालून घराबाहेर पडले. त्यामुळे चहाच्या दुकानांवर दिवसभर थंडीपासून बचाव करण्यासाठी चांगलीच गर्दी उसळली होती. रात्री शेकोट्यांभोवती बसून लोक थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र होते. 

आज शहरात मोसमातील सर्वाधिक थंडीची नोंद झाली नसली तरी बोचऱ्या थंड्या वाऱ्यामुळे लोकांनी गरम पेय, गरम पदार्थ खाऊन थंडीत उब मिळवण्याचा प्रयत्न केला. शासकीय कार्यालयांमध्येही ऊब मिळवण्यासाठी कर्मचारी वारंवार उन्हात येत होते. शहरात यंदाच्या मोसमातील सर्वात कमी ७.६ अंश सेल्सिअस तापमानाची डिसेंबर महिन्यात नोंद झाली होती. 
जम्मू काश्मीरवर पश्चिमी चक्रावात आणि चक्राकार वारे सक्रिय आहेत. त्याचप्रमाणे एक-दोन दिवसांत दुसरा चक्रावात हिमालयावर येण्याची शक्यता आहे. याच कारणास्तव हिमालयात बर्फवृष्टी होत असून संपूर्ण उत्तर भारत, मध्यप्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, पंजाब, दिल्ली या भागात थंडीची लाट कायम राहणार आहे. येत्या दोन-तीन दिवसांत मध्य भारतात तापमानात ते अंश सेल्सिअसने घट होईल. त्यामुळे विदर्भासह अमरावतीतही थंडीचा कडाका जाणवणार आहे. तेनासरीन हिंदी महासागरात कमी दाबाची द्रोणीय स्थिती असून त्याचे रुपांतर ठळक कमी दाबाच्या पट्ट्यात होऊ शकते. त्यामुळे हवामान अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. 

यंदाच्या मोसमात १५ डिसेंबरपासून दररोज पारा खाली घसरत होता. १५ डिसेंबरला १२.५, १६ रोजी ११.४, १७ रोजी १०.५, १८ रोजी ९.४, १९ रोजी ९.३ आणि २० डिसेंबर २०१६ रोजी अंश सेल्सिअस अशी तापमानात घट झाली होती. त्यानंतर २१ डिसेंबर २०१६ ते जाने. २०१७ पर्यंत थंडी कायम असली तरी ती फारशी बोचरी नव्हती. 

डिसेंबर २०१० मध्ये सर्वात कमी नोंद 
२१ डिसेंबर २०१० मध्ये शहरात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.त्यानंतर सहा वर्षांनी २१ डिसेंबर २०१६ रोजी ७.६ अंश असे सर्वात कमी तापमान नोंदवले आहे.  येत्या काही दिवसांत आणखी घट होऊ शकते, असा अंदाजही कृषी हवामान शास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.