आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगरमध्‍ये वाळीत टाकल्याप्रकरणी दहा आरोपींना अटक : मंत्री दीपक केसरकर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - अहमदनगर जिल्ह्यातील तिरमली (नंदीवाले) समाजातील २५ कुटुंबांना जात पंचायतीने वाळीत टाकल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास सुरू असल्याची माहिती गृह (ग्रामीण) राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली. अनिल गोटे यांनी संबंधित प्रश्न उपस्थित करताना म्हटले की, नंदीवाले समाजातील २५ कुटुंबांना जात पंचायतीने वाळीत टाकले असून चार ते पाच लाख रुपये दंड वसूल केला जातो. वाळीत टाकले असल्याने या समाजातील १८ मुले आणि २५ मुलींचे विवाह होत नाहीत. याबाबत तक्रार केली असतानाही जिल्हाधिकारी लक्ष देत नसल्याने कारवाई करावी, अशी मागणी केली. मंत्री दीपक केसरकर यांनी संबंधित मुलीने तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केल्याची माहिती सभागृहात दिली.
बातम्या आणखी आहेत...