आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTO: ही कोण्‍या कार्यक्रमाची पंगत नाही, शिक्षकांनी केलेले तेरवी आंदोलन आहे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- एका रांगेत जेवायला बसलेले लोक आणि वाढणा-या महिला या छायाचित्रात दिसतात. मात्र ही कोण्‍या कार्यक्रमाची पंगत नाही. तर, शासनाचा निषेध करण्‍यासाठी केलेले तेरवी आंदोलन आहे. आंदोलक शिक्षकांनी शासनाचा निषेध करुन प्रतिकात्‍मक तेरवीचा विधी केला. आंदोलक एवढ्यावरच थांबले नाहीत. तर, चक्‍क त्‍यांनी पंगताही बसवल्‍या. या संग्रहात आम्‍ही आपल्‍याला या अनोख्‍या आंदोलनाचे फोटो दाखवत आहोत.
अमरावती विभागीय समावेशित शिक्षण शिक्षक संघ अमरावतीच्‍या वतीने आपल्‍या विविध मागण्‍यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन करण्‍यात येत आहे. आज या आंदोलनाचा तेरावा दिवस आहे. तरीही प्रशासनाने मागण्‍यांची दखल घेतली नसल्‍याने शासनाच्‍या निषेधार्थ तेराव्‍या दिवशी तेरवी करण्‍यात आली. दिव्‍यांग विद्यार्थ्यांना समाजाच्‍या मुख्‍य प्रवाहात आणणा-या विशेष शिक्षक व परिचरांना न्‍याय द्यावा अशी या आंदोलकांची मागणी अाहे. केंद्र शासन पुरस्‍कृत अपंग समावेशित शिक्षण योजना राज्‍यात राबवली जात असताना शासनमान्‍य कर्मचा-यांच्‍या बाबतीत शासनाची उदासीन भूमिका दिसून येत असल्‍याचे आंदोलकांनी म्‍हटले आहे. या उदासीन धोरणाच्‍या निषेधार्थ प्रशासनाची तेरवी करण्‍यात आली.
सर्व फोटो- मनीष जगताप.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, आंदोलनात अशा बसल्‍या पंगता..
अखेरच्‍या स्‍लाइड्सवर पाहा, व्‍हिडियो..
बातम्या आणखी आहेत...