आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पोलिस आयुक्तलयाच्या हद्दीत जानेवारी ते ३१ ऑगस्ट या २४५ दिवसांत चोरी आणि घरफाेडीच्या तब्बल ७६२ घटना घडल्या आहेत. २०१५ मध्ये याच दरम्यान चोरी आणि घरफोडीच्या घटना ८४० होत्या, मात्र मागील वर्षी यंदाच्या तुलनेत गुन्हे उघड करण्याचे प्रमाण जास्त होते. यंदा तर चोरी उघड करण्याचे प्रमाण हे २३ तर घरफोडी उघड करण्याचे प्रमाण हे अवघे १८ टक्के ईतकेच आहे. यावरून शहर पोलिसांच्या क्राईम ब्रॅन्चसह डिटेक्शन पथकांचे काम दिसून येत आहे. डिटेक्शन वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नरत असल्याचे पोलिस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी सांगितले आहे.
अमरावती आयुक्तालयाच्या हद्दीत दहा पोलिस ठाण्यांचा समावेश आहे. या दहा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत मागील आठ महीन्यात चोरीचे गुन्हे ६२२ घडले असून त्यापैकी १४१ चोऱ्या उघड झाल्या आहेत. याच दरम्यान घरफोडीच्या १०२ घटना घडल्या असून त्यापैकी केवळ १९ घटनांचा छडा शहर पोलिसांना लावता आलेला आहे.

आयुक्तालयाच्या हद्दीतील राजापेठ, कोतवाली, गाडगेनगर, बडनेरा, नागपुरी गेट, फ्रेजरपुरा या सहा ठाण्यांना ‘डिटेक्शन ब्रँच’ डीबी स्कॉड कार्यरत आहेत. डीबी स्कॉडमधील कर्मचाऱ्यांना घडलेले गुन्हे उघड करण्याचे काम प्राधान्याने करणे अपेक्षित आहे. मात्र मागील आठ महीन्यात डीबी स्कॉडकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही, असे चित्र आहे. दिवंसेदिवस वाढत असलेली लोकसंख्या त्या तुलनेत मात्र पोलिसांची संख्या कमी आहे, त्यामुळे ठाण्यातील डीबी स्कॉडचे कर्मचारी सुध्दा डिटेक्शनच्या कामासाठी फारसा वेळ देवू शकत नाही. मात्र आयुक्तालयाच्या हद्दीतील गुन्हे उघड करण्याची सर्वाधिक जबाबदारी ही क्राईम ब्रँचची आहे.

यातही सद्या शहर पोलिसांकडे असलेल्या क्राईम ब्रँच मध्ये तब्बल ५५ ते ५७ कर्मचारी, अधिकारी कार्यरत आहे. तरीही क्राईम ब्रॅचकडून भरीव कामगिरी अलीकडच्या काळात झाली नाही. ठाण्यांच्या पोलिसांना ‘डिटेक्शन’सोबतच ईतर बंदोबस्त कामाचा ताण अधिक राहतो मात्र क्राईम ब्रँचकडे ठाण्यातील पोलिसांच्या तुलनेत ईतर कामांचा व्याप कमी असतो. त्यामुळे क्राईम ब्रँच कडून डिटेक्शनच्या अपेक्षा असतात. असे असले तरी मागील चार महिन्यांचा क्राईम ब्रँचच्या कामगिरीवर वरीष्ठ सुध्दा असमाधानी असल्याची चर्चा आयुक्तालयात सुरू आहे.

मागीलवर्षीच्या तुलेनत यंदा झाली गुन्ह्यात घट
दरम्यानमागील वर्षीच्या तुलनेत ईतर गुन्ह्यांमध्ये सुध्दा यंदा घट झाली आहे. यामध्ये दंगलसदृश गुन्हे मागील वर्षीच्या तुलनेत २२ ने कमी झाले आहे. अपहरणाचे गुन्हे २४, वाटमारी, जबरी चोरीचे गुन्हे ३९ ने कमी झाले आहे. यासोबतच मंगळसूत्र चोरी, दिवसा रात्रीच्या घरफोडी मध्ये सुध्दा घट झालेली आहे. याचवेळी मात्र वलगाव ठाण्यात १५, राजा पेठमध्ये ७३ आणि खोलापूरी गेट ठाण्यात १५ गुन्ह्यांची वाढ झाली आहे. असे असले तरी मागील वर्षीच्या तुलनेत जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांचा लेखाजोखा पाहीला असता पोलिस आयुक्तालयातील एकूण गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. वारंवार रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करणे, कोंम्बींग ऑपरेशन राबवणे, अशा कारवाईंमुळे गुन्ह्यांमध्ये घट झाली असल्याचे पोलिस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी सांगितले.वारंवार सूचना देऊनही कामगिरी सुधारलेल्या काही पोलिस अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.

क्राइम ब्रँच डीबी पथकाला जोमाने काम करण्याच्या सूचना
^जानेवारी ते ऑगस्ट २०१५ या दरम्यान आयुक्तालयात प्रभावी पोलिसिंगच्या माध्यमातून गुन्हे कमी व्हावे यासाठी प्रयत्न केले आहेत, त्यामुळे गुन्ह्यांची संख्या घटली आहे. याचवेळी मागील वर्षीच्या तुलनेत डिटेक्शनचे प्रमाण कमी आहे, त्यामुळे डिटेक्शन वाढवण्यासाठी आमचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे. क्राईम ब्रँच डीबी पथकाला जोमाने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दत्तात्रयमंडलिक, पोलिस आयुक्त.

बातम्या आणखी आहेत...