आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अट्टल घरफोड्यास अखेर पकडले, पालघर पोलिसांची शहरात कारवाई, एकूण २० घरफोड्यांची दिली कबुली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातील हबीबनगर क्रमांक मध्ये राहणाऱ्या एका अट्टल घरफोड्याला पालघर जिल्ह्यातील नालासोपारा पोलिसांनी शहरात येऊन अटक केली असून,त्याने आतापर्यंत २० घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्याच्याकडून जवळपास पावणे सहा लाख रुपयांचे चोरीचे सोने रोख रक्कम नालासोपारा पोलिसांनी जप्त केली आहे.
अब्दुल गफ्फार अ. मजीद शेख (४८, रा. हबीबनगर क्रमांक २) असे नालासोपारा पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अ. गफार अ. मजीद याच्याविरुद्ध नालासोपारा पोलिस ठाण्यात तब्बल आठ गुन्हे दाखल आहे. तसेच नालासोपाराला लागूनच असलेल्या तुळीज पालघर ठाण्यांमध्ये सुद्धा गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याने मागील आठ महिन्यांत नालासोपारा हद्दीत आठ घरफोडी, तुळीज ठाण्याच्या हद्दीत आणि पालघरच्या हद्दीत चार अशा १२ घरफोडी २०१४ ते २०१५ दरम्यान केल्याचे उघड झाले आहे. या चोरीमधील सोन्याचे दागिने त्याने मुंबईतील एका सुवर्ण व्यावसायिकाला विकल्याचे तपासादरम्यान पुढे आल्यामुळे नालासोपारा पोलिसांनी संबधित सुवर्णव्यावसायिकाकडून दोन दिवसांपुर्वी तब्बल १८३ ग्रॅम सोने किंमत अंदाजे लाख ४९ हजार, तसेच एक मोबाईल रोख असा एकूण पावणे सहा लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. सद्या हा चोरटा नालासोपारा पोलिसांच्या कोठडीत असून यानंतर त्याला तुळीज पोलिस ताब्यात घेणार आहे, अशी माहिती नालासोपारा पोलिसांनी दिली आहे. त्याला अटक करण्यासाठी अमरावतीत आलेल्या पथकामध्ये एपीआय प्रताप दराडे, एएसआय सुदेश कांबळी, प्रकाश साईल, संतोष सुर्वे, रुस्तम राठोड, अश्वीन पाटील या पथकाने केली आहे. विशेष हा चोरटा मागील अनेक महीन्यांपासून शहरात वास्तव्य करत आहे. वीज बिल पाहणे, देणगीसाठी येताे घरात : अ.गफ्फार अ. मजीद शेख हा नालासोपारा परिसरात दुपारच्या वेळी ज्या घरात वृद्ध व्यक्ती आहेत, अशा घरांना लक्ष्य करून प्रवेश करतो. वीज बिल भरले का? किंवा अंधासाठी देणगी पाहिजे अशी बतावणी करून घरांमध्ये प्रवेश करतो संधी साधून चोरी करतो. तो शहरात राहतो मात्र त्याचा मुलगा मुंबईत आहे, त्यामुळे मुलाकडे गेला की, तो अशाप्रकारे हात साफ करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

२००६ मध्ये वसई पोलिसांनी केली होती अटक : मुंबईतीलवसई पोलिसांनी याला २००६ मध्ये अटक केली होती. त्यानंतर मात्र तो पोलिसांना मिळात नव्हता. दोन वर्षांपुर्वी पोलिसांनी मुंबईत त्याच्या शोधासाठी भित्तीपत्रक प्रकाशित करून बक्षिस ठेवले होते. मात्र तो मिळाला नव्हता.
शहरपोलिस घेताहेत माहिती : सदरप्रकरणातील चोरटा हा शहरातील रहिवासी आहे, मात्र अमरावती शहर पोलिसात त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल आहे किंवा नाही, याबाबत शहर पोलिस माहिती घेत आहे, असे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल किनगे यांनी सांगितले.
आणखीगुन्हे होणार उघड : दिवसाघरफोडीचे तब्बल वीस गुन्हे त्याच्याकडून उघड झाले असून, पावणे सहा लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आम्ही त्याला अमरावतीतून अटक केली आहे. त्याच्याकडून अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे,असे एपीआय तथा तपास अधिकारी प्रताप दराडे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...