आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झोपडपट्टीतील प्रशिक्षक देतोय गरजू खेळाडूंना धडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मोहम्मद अली, माईक टायसन सारख्या गल्लीत वाढलेल्या जगज्जेत्या योद्ध्यांच्या मनगटातील ताकद लहाणपणी हेरून त्यांना प्रशिक्षणाचे बळ देऊन दिशा देण्याचे काम त्यांच्या गुरुजनांनी केले होते. गुरूंच्या मार्गदर्शनाने कफल्लक असलेल्या या खेळाडूंनी पुढे इतिहास घडवला. परिस्थितीशी झगडत असलेले असे शेकडो खेळाडू आज आपल्या अवतीभवती दिसून येतात. शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये असलेली हीच मनगटातील ताकद हेरून तिला बळ देण्याचे काम मार्शल आर्ट प्रशिक्षक रुपेश तायडे करीत आहेत. परिस्थितीने कोळशाच्या खाणीत पडलेल्या हिऱ्यांना पैलू पाडून रूपेशने आज अनेक झोपडपट्टीतील खेळाडूच्या मुक्क्यांना बळ पुरवत राष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवले आहे. फुटकी कवडीही घेता कफल्लक असलेल्या या ‘द्रोणा’चे हात ‘एकलव्य’ घडवण्यासाठी झिजत आहेत.
चिखलात कमळ उमलते तसेच कोळशाच्या खाणीत हिरे सापडतात. याची गरिबीतून वर आलेल्या मार्शल आर्ट प्रशिक्षक रुपेश तायडेला याची जाणीव होती. खेळासाठी पैसा लागतो तरी त्याची पर्वा करता रूपेशने गरीब घरातील खेळाडूंच्या मनगटातील ताकद हेरून त्यांना नि:शुल्क प्रशिक्षणाचे बळ देऊन मुष्टीयोध्यांपासून ते कराटेपटूंपर्यंत अनेक राज्य राष्ट्रीय स्पर्धा गाजवणारे खेळाडू घडवले आहेत. शहरातील अनेक नामांकित मंडळी लप्पी जाजोदिया, पवन जाजोदिया, तायवाडे, प्रदीप दंदे, आमदार बच्चू कडू, आमदार रवि राणा यांनी त्याच्या खेळाबद्दल असलेल्या समर्पण भावनेची दखल घेत त्याला स्वयंस्फुर्तीने मदत करण्यास सुरुवात केली. या आधारे रुपेशला खेळाडूंना स्पर्धेत सहभागी होण्यास पाठवणे शक्य झाले आहे. रुपेशकडे असे शालेय विद्यार्थी प्रशिक्षण घेतात ज्यांची आर्थिक स्थिती बेताची आहे. कोणाचे वडील रिक्षा चालवतात, कोणी बांधकाम मजूर आहे तर कोणी जनावरे चरायला नेतात. प्रशिक्षण घेणाऱ्यांमध्ये बहुतेक झोपडपट्टीत राहणारी मुले आहेत.

अंधारात, उघड्यावर खेळाडंूचा सराव
रुपेश तायडे विभागीय क्रीडा संकुलातील सभागृहात नि:शुल्क विद्यार्थी घडवत होता. मात्र अडचणीने त्याला येथे प्रशिक्षण देण्यास मज्जाव केल्यामुळे शुल्क भरण्याइतपत पैसेही नसलेल्या रुपेशला मुलांना जिल्हा स्टेडियमवर अंधारात उघड्यावर खेळाडू घडवावे लागत आहेत.

स्वयंसिद्धांतर्गत ते हजार मुलींना प्रशिक्षण
स्वयंसिद्धा उपक्रमांतर्गत ते हजार मुलींना आत्मरक्षणाचे धडे दिलेे. धारणी, चिखलदऱ्यातील मुलींना प्रशिक्षण दिलेे. यात रुपेश तायडेंच्या शिष्या रिया बन्सोड, पूनम गुडधे, दिव्या भालेकर, अपेक्षा आगरे, अंजली, आरती पाटील, साक्षी नेमनवार, पल्लवी कलाने या मुलींना, कुशल तायडे, सुमीत कलानी, ऋषिकेश पंचवटे, अमन यादव, सुखविंदर संधू हे मुलांना प्रशिक्षण देतात.

मुलांचे भविष्य घडावे म्हणून करतोय खटपट
मी पोलिस दलात कार्यरत माझे दोन मित्र मनीष बिजवे, आशिष शिंगणे यांनी गरजु विद्यार्थ्यांचे त्यांचे भविष्य घडावे, खेळातून त्यांना टक्के आरक्षणांतर्गत नोकरी मिळावी त्यांचे भविष्य उज्वल व्हावे. त्यांनीही चांगला समाज घडवावा या भावनेतून २००९ पासून प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली, त्याचे उत्तम फलीत मिळत असल्याची प्रतिक्रिया प्रशिक्षक रुपेश तायडेने व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...