आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशाचे भविष्य युवकांच्या हाती : डाॅ. विजय भटकर यांचे प्रतिपादन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दर्यापूर : भारतदेश हा युवकांचा देश म्हणून अोळखल्या जात असून देशाचे भविष्य या युवाशक्तीच्या हातात आहे. युवक हा राष्ट्राचा कणा आहे. एकविसावे शतक भारताचेच आहे. त्यामुळे युवकांनी दुर्दम्य इच्छाशक्ती ठेवूनच कार्यरत रहावे, असे प्रतिपादन परम संगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांनी केले. ते जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयात डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंती उत्सव पर्वावर ‘भेट एका शास्त्रज्ञाची’ या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होते.
 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. दिनकरराव गायगोले, तर प्रमुख अतिथी म्हणून अण्णासाहेब रेचे, गजानन पुंडकर, प्राचार्य. डॉ. रामेश्वर भिसे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी डॉ. भटकर यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे देताना विज्ञान अध्यात्म यासंबंधी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. नरेंद्र माने यांनी केले, तर प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे यांनी आभार मानले. या प्रसंगी संस्थेचे आजीवन सभासद, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित हाेते. 
 
बातम्या आणखी आहेत...