आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बापाच्या जेवणाचा खर्च विचारतो का? मुख्यमंत्र्यांचा सवाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासाठी सरकारने किती निधीची तरतूद केली आहे, हा प्रश्न विचारणाऱ्यांची मला कीव येते, अशी टिप्पणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. बापाला जेवायला किती पैसे लागतात म्हणून आपण विचारतो का? छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आम्ही आज आहोत. त्यांच्या स्मारकासाठी सरकार निधीचा विचार करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकासंबंधीची माहिती शुक्रवारी विधानसभेत दिली. शिवस्मारकाच्या खर्चावरून कोणी कितीही टीका केली तरी या स्मारकाचा खर्च करताना सरकार हात आखडता घेणार नसल्याचे फडणवीस म्हणाले.

फडणवीस म्हणाले की, यापूर्वीच्या सरकारलाही अरबी समुद्रातील शिवस्मारक करायचे होते. तत्कालीन मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांनी त्यासाठी प्रयत्न केले, पण ते करू शकले नाहीत. आमच्या सरकारने स्मारकासाठी आवश्यक असलेल्या सर्व बारा परवानग्या मिळवल्या. सुमारे ३ हजार ७०० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार आहे. पहिल्या टप्प्यात रेक्लमेशनसाठी तेवीसशे कोटी खर्च केले जातील.
शिवस्मारकासाठी लागणाऱ्या निधीकडे सरकार ‘खर्च’ म्हणून पाहत नाही. ही गुंतवणूक आहे. त्यातून पर्यटन वाढेल. शिवाय शिवस्मारकात येणारा प्रत्येक तरुण येथून शिवचरित्रातून प्रेरणा, स्फूर्ती घेऊन जाईल. यातून ज्ञानाधिष्ठित समाज उभारण्यास मदत होईल, असे फडणवीस म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...