आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षातील पहिला, शेवटचा ‘सुपरमून’ उद्या; चंद्र रोजपेक्षा 14 पट मोठा दिसणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - येत्या तीन डिसेंबरला मार्गशीर्ष पौर्णिमेला सर्वात मोठा चंद्र म्हणजेच सुपरमून पाहण्याची संधी मिळणार आहे. रविवारी रात्री चंद्र रोजच्यापेक्षा १४ पट मोठा आणि १६ पट तेजस्वी दिसेल. २०१७ मधील हा पहिला आणि शेवटचा सुपरमून असेल. यानंतर २ जानेवारी २०१८, १९ फेब्रुवारी २०१९ व ८ एप्रिल २०२० रोजी सुपरमूनचे दर्शन होईल.  


मार्गशीर्ष पौर्णिमेला चंद्र आणि पृथ्वीतील अंतर ३ लाख ५७ हजार ४९२ किलोमीटर राहील, अशी माहिती रामन सायन्स सेंटरचे तंत्र सहायक महेंद्र वाघ यांनी दिली. पौर्णिमेचा चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ येतो तेव्हा तो आकाराने खूप मोठा दिसतो. या चंद्राला सुपरमून म्हटले जाते. पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत प्रदक्षिणा घालताना चंद्र पौर्णिमेला पृथ्वीच्या जवळ येतो. त्याला आॅर्बिट इलेप्टिकल असे म्हणतात, असे वाघ म्हणाले.   


पृथ्वीच्या कक्षेत फिरताना चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो त्या स्थितीस ‘पेरिजी’ आणि जेव्हा दूर जातो त्या स्थितीस ‘अपोजी’ म्हणतात. एरवी चंद्र पृथ्वीपासून सरासरी ३ लाख ८४ हजार किमी अंतरावर असतो. पण या वेळेस पौर्णिमेला चंद्र ३ लाख ५७ हजार किमी अंतरावर येईल. मार्गशीर्ष पौर्णिमा रात्री ९ वाजून १७ मिनिटांनी पूर्ण होईल. 


मागील वर्षी तीन सुपरमून   
२०१६ मध्ये पहिला सुपरमून १६ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहायला मिळाला होता. त्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या ३,५७,८५७ किलोमीटरइतका जवळ गेला होता. त्यानंतर  १४ नोव्हेंबर २०१६ ला दुसरा आणि १४ डिसेंबर २०१६ ला सुपरमून दिसला होता.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, सुपरमून व पृथ्वीपासूनचे अंतर... 

बातम्या आणखी आहेत...