आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदारांच्या वाढत्या वजनाची सरकारला चिंता,सत्ताधाऱ्यांचे वजन अधिक वाढले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर : वाढलेले पोट आणि लठ्ठपणा हा कायम चिंतेचा विषय असतो. शरीरातील अतिरिक्त चरबीमुळे पोट वाढते, पोट वाढल्यामुळे वजन वाढते आणि वजन वाढल्यामुळे चिंता वाढते... चिंंता वाढली की रक्तातील साखर, रक्तदाब वाढतो आणि त्यामुळे हृदयविकार बळावण्याची शक्यता असते...एवढ्या सर्व गोष्टी एका वजन वाढल्यामुळे होतात...
वाढत्या वजनाची चिंता प्रत्येकाला करावीच लागते. त्यातही राजकारणात विशेषकरून... कारण प्रतिस्पर्ध्याचे वाढलेले राजकीय वजन घातक ठरू शकते. अर्थात हे झाले राजकारणाचे. पण शारीरिक वजनही वाढले की त्रासदायक ठरते. निदान ते तरी जास्त वाढू नये म्हणून सरकारने आमदारांसाठी बुधवारी लठ्ठपणा तपासणी शिबिराचे आयोजन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
राज्य शासनाचा वैद्यकीय शिक्षण विभाग व जे. टी. फाउंडेशन यांच्या वतीने अधिवेशनासाठी आलेल्या लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विधिमंडळाच्या आवारातील प्राथमिक उपचार कक्षात हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय वजन वाढलेलेच आहे आणि शारीरिक वजन त्यांनी कमी केलेले आहे. त्यामुळे त्यांनी येथे वजन तपासून घेतले नाही.
राजकीय क्षेत्रात काम करताना अनेक ताणतणाव येत असतात. अशा वेळी शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष दिले तर अधिक जोमाने काम करू शकतो. म्हणून शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. जाधवांचे वजन १०६ किलो : विधान मंडळातील २२ लोकप्रतिनिधींनी वाढत्या वजनाची तपासणी करून घेतली.
आमदार संदीप जाधव यांचे वजन १०६ किलो भरले. त्यांची उंची १८२ सें. मी. भरली. त्याखालोखाल भाजपचे आमदार सरदार तारासिंग यांचे ८२.९ किलो वजन भरले. भाजपचेच विधान परिषद सदस्य अनिल सोले यांचे वजन ७८ किलो तसेच आमदार स्मिता वाघ यांचे वजन ६३.७ किलो भरले. एकूणच सत्ताधारी आमदारांच्या वजनात भरपूर वाढ झाल्याचे यानिमित्ताने दिसून आले.
बातम्या आणखी आहेत...