आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदाच्या हिवाळ्यात सर्वात कमी तापमानाची नोंद; पारा ७.५ अंशांपर्यंत, दारे, खिडक्या सायंकाळी बंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - एका आठवड्यापासून शहर थंडीने गारठले असून पारा ७.५ अंशांपर्यंत खाली घसरल्याने शहरवासीयांना हुडहुडी भरली. बोचरे वारे अंगाला शहारे आणत असल्याने दिवसा फिरताना गरम कपडे घालून घराबाहेर पडत आहेत. सायकाळी वाजता थंडीपासून बचावासाठी घराची दारे, खिडक्या बंद केले जात आहेत. 

शुक्रवारी पहाटे यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. काही दिवसांत तापमान आणखी खाली घसरण्याची शक्यता आहे. उत्तरेकडून थंड वारे दक्षिण भारताकडे वाहायला सुरुवात झाली असून उत्तर भारतात सुरू असलेल्या बर्फ वृष्टीमुळे शहर गारठल्याची माहिती कृषी हवामान शास्त्र विभागाने दिली. जम्मू काश्मीरवर पश्चिमी चक्रावात, चक्राकार वारे सक्रीय असतानाच दुसरा चक्रावात हिमालयावर आला. याच कारणास्तव हिमालयात बर्फवृष्टी होत असून उत्तर भारत, मध्यप्रदेश, विदर्भात थंडीची लाट राहणार आहे. त्यामुळे बोचरे वारे अंगाला झोंबणार आहेत. त्यामुळे कडाक्याची थंडी राहणार आहे. 
 
यंदाच्या मोसमात १५ डिसेंबरपासूनचा विचार करता दररोज पारा खाली घसरत होता. १५ डिसेंबरला १२.५, १६ रोजी ११.४, १७ रोजी १०.५, १८ रोजी ९.४, १९ रोजी ९.३ आणि २० डिसेंबर २०१६ रोजी अंश सेल्सिअस अशी तापमानात घट झाली होती. त्यानंतर २१ डिसेंबर २०१६ ते जाने. २०१७ पर्यंत थंडी असली तरी ती बोचरी नव्हती. मात्र जाने.पासून दररोज तापमानात घट नोंदवली. शुक्रवारी यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. काही दिवस थंडी राहणार असा अंदाज कृषी हवामान शास्त्र विभागाने वर्तवला. 

डिसेंबर २०१०; सर्वात कमी तापमान नोंद 
२०१० च्या डिसेंबर महिन्यातील २१ तारखेला शहरामध्ये आजवरचे सर्वात कमी तापमान अंश सेल्सिअस असे नोंदवण्यात आले होते. त्यानंतर सहा वर्षांनी म्हणजे २१ डिसेंबर २०१६ रोजी ७.६ अंश सेल्सीअस असे सर्वात कमी तापमान नोंदवण्यात आले होते. दरम्यान शुक्रवारी १३ जानेवारीला शहरातील तापमान ७.५ अंशांपर्यंत खाली आले आहे.