आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका विषय समित्यांचे गठन २० ला, सर्वसाधारण सभेमध्ये सदस्यांच्या नावांची घोषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महापालिकेच्या चार विषय समितीवर सदस्यांची निवड २० एप्रिलच्या सर्वसाधारण सभेत केली जाणार आहे. नियमानुसार विषय समित्यांचे गठन केले जाणार आहे. यामध्ये विधी, शहर सुधार, माध्यमिक पूर्व माध्यमिक तांत्रिक शाळा समिती तसेच महिला बालकल्याण समितीचा समावेश आहे.
महापौर चरणजित कौर नंदा यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता आयोजित सभेत विषय समितीमध्ये प्रत्येकी सदस्यांच्या नावांची घोषणा केली जाईल. मनपातील विविध राजकीय गटांकडून विषय समितीवर सदस्यांची नावे येणे अपेक्षित आहे. सभेत सदस्यांच्या नावांची घोषणा केल्यानंतर सभापती उपसभापतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होईल.एप्रिलमध्ये चार विषय समिती सभापती उपसभापतींचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्यामुळे नव्याने विषय समित्यांचे गठन करत सभापती उपसभापतींची निवड केली जाणार आहे. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.वर्तमान महापालिकेच्या अंतिम वर्षातील या विषय समित्या राहतील. त्यामुळे संधी मिळालेले नगरसेवक या वेळेस तरी सभापती वा उपसभापतिपद मिळेल या आशेवर आहेत. मागील वर्षी नव्याने निर्माण केलेल्या परिवहन समितीचे गठन तसेच सभापती निवडीनंतर अनेकांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस वाढल्याचे सत्य बाहेर आले. स्थायी समिती सभापती निवडणुकीत सत्ताधारी आघाडीतील फ्रंट काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली. स्थायी समिती निवडीचा महापालिकाच नाही, तर शहरातील राजकारणावर प्रभाव दिसून आला. खोडके गटाचे अविनाश मार्डीकर सभापती झाल्यानंतर रावसाहेब शेखावत गटाची एकप्रकारे हार झाल्याचे संकेत राजकीय वर्तुळात गेले.