आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा विद्यार्थी संसद निवडणुका, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक मंजूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर: राज्यात महाविद्यालये व विद्यापीठांत विद्यार्थी संसद निवडणुकांचे फड २५ वर्षांनंतर पुन्हा रंगणार आहेत. विद्यार्थी संसदेच्या थेट निवडणुकांची तरतूद असलेल्या नव्या ‘महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक-२०१६’ला गुरुवारी विधानसभेने मंजुरी दिली. विधान परिषदच्या मंजुरीनंतर त्याचा कायदा होईल.
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी हे विधेयक मांडले. विधेयकानुसार, महाविद्यालय व विद्यापीठ परिसरात अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी, आरक्षित संवर्ग प्रतिनिधींची निवड विद्यार्थी थेट मतदानाद्वारे करतील, तर विद्यापीठ विद्यार्थी संसदेच्या पदाधिकाऱ्यांची निवड चार महाविद्यालय प्रतिनिधी करतील.
ही प्रक्रिया दरवर्षी कालबद्ध पद्धतीने व राजकीय हस्तक्षेपाशिवाय असेल.

अशा असतील तरतुदी
- अधिसभेत विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष व सचिवाचे प्रतिनिधित्व.
- विद्यार्थी कल्याण मंडळ, क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ यांसारख्या समित्यांत विद्यार्थ्यांना प्रतिनिधित्व.
- व्यवस्थापन परिषदेमध्ये विद्यापीठ विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष निमंत्रित सदस्य. कॉलेज विकास समितीत परिषद पदाधिकारी.
बातम्या आणखी आहेत...