आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भरदुपारी चोरट्यांनी फोडले दोन फ्लॅट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - साईनगर परिसरातील हरिशांती कॉलनीमध्ये रविवारच्या मध्यरात्री सात ते आठ दरोडेखोरांनी धुडघूस घालून चार घरात दरोडा टाकल्याच्या घटनेची दहशत कायम असतानाच मंगळवारी भरदुपारी अजुर्ननगरमधील एकाच अपार्टमेंटमधील दोन बंद फ्लॅट चोरट्यांनी फोडले. यावेळी एकाच फ्लॅटमधून तब्बल पावणे तीन लाखांचा ऐवज लंपास केला. तर दुसऱ्या फ्लॅटमधून मोबाईल चोरीला गेला.
नीलिमा दिलीप केदार (५२, रा. समृद्धी हाईट्स अपार्टमेंट, अर्जुननगर) यांच्या फ्लॅटमध्ये चोरट्यांनी प्रवेश करून जवळपास पावणे तीन लाखांचा ऐवज लंपास केला. नीलिमा केदार या शिक्षिका असून, मंगळवारी दुपारी त्या शाळेत गेल्या होत्या तर त्यांच्या कुटूंबातील इतर सदस्य कामानिमित्त घराबाहेर होते. त्यामुळे फ्लॅट बंद होता. पहिल्या माळ्यावर केदार यांच्या बंद फ्लॅटचे मुख्य दार तोडून चोरटे आंत शिरले. त्यांनी कपाट फोडून ४५ ग्रॅमचे मंगळसूत्र, ३० ग्रॅमचे बांगड्या, ग्रॅमचे कानातील दागिन्यांसह ४६ हजार रुपयांची रोख लंपास केली. यानंतर चोरट्यांनी याच अपार्टमेंटमधील दुसऱ्या माळ्यावर राहत असलेले श्री फरकाळे यांच्या घरात शिरून चोरट्यांनी मोबाईल चोरून नेला. या दोन्ही चोऱ्यांची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दरम्यान श्वान पथकालासुध्दा पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी नीलिमा केदार यांच्या तक्रारीवरून चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसगस्त मुख्य शहरातच: अलीकडच्याकाळात पोलिसांची गस्त ही केवळ शहरातील मुख्य चौकात आणि मुख्य मार्गावरच दिसून येते. कारण चारचाकी मोबाईल व्हॅनमधून पाेलिस गस्त करतात. या मोबाईल व्हॅन शहरातील अंतर्गत रस्त्यांवर येत नाही, आली तरी गस्तीसाठी असलेले पोलिस वाहनाच्या खाली येण्यास उत्सुक नाही. अर्जुननगर भागात पोलिसांचे गस्त वाहन किंवा चार्ली कमांडो दिसने म्हणजे दुर्मिळ आहे. अशी चर्चा चोरीनंतर अजुर्नननगर भागात सुरू होती.
बातम्या आणखी आहेत...