आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार ठाकूर यांच्या घरात ५० हजारांची चोरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - तिवसामतदार संघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या गणेडीवाल लेआऊटस्थित बंगल्यामध्ये रंगकामासाठी आलेल्या एका उत्तर प्रदेशातील पेंटरने घड्याळ टॅब असा ५० हजारांचा ऐवज सप्टेंबरला चोरला होता. या प्रकरणी शनिवारी १० सप्टेंबरला रात्री गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याकडून चोरीला गेलेल्या घड्याळ टॅब जप्त केले आहेत.
आशिष अयोध्या प्रसाद पांडे (२३, रा. धनकतारा, आलापुर, उत्तरप्रदेश ह. मु. गजानन नगर बिच्छू टेकडी, अमरावती) याला अटक करून पोलिसांनी त्याच्याकडून घड्याळ टॅब जप्त केले. आशिष पांडे हा आमदार ठाकूर यांच्या गणेडीवाल लेआऊटमधील बंगल्याच्या रंगरंगोटी कामावर आला होता. दरम्यान घरी कोणी नसल्याची संधी साधून त्याने सप्टेंबरला घरातील बेडरुममध्ये ठेवलेल्या रिबॉक, हॅलोकीट्टी ३, वेकीर १, स्प्रीशीट, टायटन, रोचिस, इवा या महागड्या घड्याळ किंमत अंदाजे ३० हजार तसेच सॅमसंग कंपनीचा टॅब किंमत २० हजार असा एकूण ५० हजारांचा ऐवज चोरला अशी तक्रार आमदार ठाकूर यांचे स्वीय सहायक विशाल रत्नाकर राऊत (३५, रा. शिरजगाव) यांनी शनिवारी १० सप्टेंबरला गाडगेनगर पोलिस ठाण्यात दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अाशिष पांडे विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला. तसेच संशय व्यक्त केल्यामुळे पोलिसांनी त्याला तातडीने अटक करून त्याच्याकडून सर्व ऐवज जप्त केला आहे.
चोरट्याला अटक, ऐवज केला जप्त
^आमदार ठाकूरयांच्या घरात चोरी झाल्याची तक्रार प्राप्त होताच आम्ही गुन्हा दाखल करून चोरट्याला अटक केली. त्याने चोरलेल्या सर्व घड्याळ टॅब जप्त करण्यात आला आहे. कैलाश पुंडकर,ठाणेदार, अमरावती.
बातम्या आणखी आहेत...