आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरांसमोर पोलिसांच्या नांग्या; चांदूर रेल्वेत पाच चोऱ्या, वरुडमध्येही घरफोडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्ह्यात शहरासह चोऱ्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून मागील १२ दिवसांत सुमारे ३६ घरफोड्या झाल्या अाहेत. यात अमरावती शहरात सर्वाधिक २१ घरफोड्या झाल्या. यासोबतच याच दरम्यान शहरात १३ दुचाकी चोरीच्या घटना घडल्या.
 
दरम्यान, परतवाडा चांदूर रेल्वे तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शहरासह जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ कायम असल्याने पोलिस प्रशासनाने हतबल होऊन चोरांसमोर नांग्या टाकल्या काय असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून विचारला जात आहे. शहरात ठिकठिकाणी भरदिवसा होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे पोलिस प्रशासनाच्या कार्यवाहीबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 
 
अलिकडच्या काळात जिल्ह्यासह शहरात चोरींच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहरात चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी आयुक्तालयाच्या वतीने शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. यासाठी सीआर व्हॅनही रात्रंदिवस गस्त घालत आहेत. गल्लीबोळातही रात्री पोलिसांच्या गस्त सुरू आहेत. परंतु त्यानंतरही एकाच रात्री तीन ते पाच घरफोड्यांचे सत्र कायम आहे. त्यामुळे पोलिसांची गस्त म्हणजे नेमके काय, हा प्रश्न शहरवासीयांसोबत जिल्ह्यातील नागरिकांमध्ये निर्माण झाला. दरम्यान, मागील १२ दिवसांत जिल्ह्यात सुमारे ३६ चोऱ्या झाल्या असून यात १५ ग्रामीण भागात तर २१ घरफोड्या एकट्या शहरात झाल्या आहेत. जिल्ह्यात इतर चोऱ्यांच्या सुमारे २२ घटना घडल्या असून १३ घटना शहरात घडल्या आहेत. घरफोड्यांसोबत दुचाकी चोरीचाही शहरातील आलेख चढताच आहे. १२ दिवसांत जिल्ह्यात १७ दुचाकींची चोरी झाली. यात ग्रामीण भागात तर शहरात १३ दुचाकीच्या चोऱ्या घडल्या. यातील काही घटना भरदिवसा घरासमोरून दुचाकी चोरून नेल्याच्या आहेत. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक चिंताग्रस्त झाले असून, पोलिस प्रशासनाने चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी होत आहे. 
 
ठोस कारवाई हवी 
मागीलकाही दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. चाेरांमुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने आता ठोस कारवाई करून चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी होत आहे. चोरीच्या घटनांना आळा घालण्याची गरज आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...