आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजसेवेचा नंदादीप आमटेंच्या तिसऱ्या पिढीच्या हातात!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - अादिवासी, वंचित वर्गाला जीवनातील नवी पहाट दाखवणारे ज्येष्ठ समासेवक बाबा अामटे यांनी सुरू केलेले सेवा- सुश्रूषेचे व्रत त्यांचे पुत्र प्रकाश व विकास अामटे यांनी पुढे सुरू ठेवले. अाता बाबांची तिसरी पिढी म्हणजे प्रकाश अामटे यांचे पुत्र अनिकेत व सूनबाई समीक्षा हे दांपत्यसुद्धा हाच समाजसेवेचा वसा घेऊन मार्गक्रमण करत अाहेत.

हेमलकसा येथून २७ किलाेमीटर दूर असलेल्या अतिदुर्गम नेलगुंडा येथे अनिकेतने आदिवासींच्या मुलांसाठी साधना विद्यालय ही इंग्रजी शाळा सुरू केलीय. त्यासाठी एका आदिवासीकडूनच दोन एकर जागा भाडेतत्त्वावर घेतली. नेलगुंडा, कवंडे, मेडदापल्ली, गोंगवाडा, मोरोमेट्टा आणि महाकापाडी या गावांतून ५ किलोमीटरवरून हे विद्यार्थी शाळेत येतात. ही शाळा पाचव्या वर्गापर्यंत वाढविण्याचा सध्यातरी संकल्प असल्याचे अनिकेत यांनी सांगितले.

बाबा आमटेंनी नंदनवन वसवलं, प्रकाश आमटेंनी हेमलकसा उभ केलंय आणि आता अनिकेत नेलगुंडा वसवत आहे. साखरझोपेत पाहिलेली स्वप्ने झोप उघडताच विसरली जातात. पण जागेपणी जाणिवेनी पाहिलेली स्वप्नं साकार होतात. नेलगुंडा हे अनिकेत आमटे यांनी जागेपणी पाहिलेले असेच एक स्वप्न आहे. बाबा अामटे वरोऱ्याला आले तेव्हा इतरांच्या दृष्टीने तो भागा दुर्गमच होता. डाॅ. प्रकाश व मंदा आमटे हेमलकसा इथे आले तेव्हा तो भाग त्याहीपेक्षा दुर्गम होता आणि आता अनिकेत व समीक्षा ज्या नेलगुंडा येथे आले. ते तर अतिदुर्गम आहे. वीज, पाणी, रस्ते अशी कोणतीही मूलभूत सोय नाही. रोटी, कपडा आणि मकान या तीन गोष्टी बहुतांशांच्या नशिबी नाही. वर्षातून सहा महिने गावाचा इतर जगाशी असलेला संपर्क तुटलेला असतो. अशा ठिकाणी अनिकेत व समीक्षा आमटे यांनी शाळा सुरू केली आहे. पहिल्याच वर्षी साधना विद्यालयाची पटसंख्या ५२ झाली आहे. पाच किलोमीटरची पायपीट करून एकही दिवस दांडी न मारता मुले नियमित उपस्थित राहत आहे.

दाेन अभियंते, शिक्षक करताहेत अध्यापन
या शाळेसाठी अनिकेतसाेबत काम करणारे उच्चशिक्षित आहेत. सहा शिक्षक, दाेन हेल्पर आहेत. सातारामधील दोन इंजिनिअर तरुणांनी अध्यापनाची जबाबदारी घेतली अाहे. एक मुलगी डोंबिवलीची, एक शिक्षक लाेकबिरादरीतील तर दाेन शिक्षक हे अादिवासी तरुण आहेत. ही मंडळी एक ते दाेन वर्षे शिकवणार आहेत. सरकारकडून जागा मिळाल्यास शैक्षणिक, पर्यावरण संवर्धन व आरोग्याविषयी अनेक योजना राबविण्याचा विचार आहे, असे अनिकेत यांनी सांगितले.