आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात स्फोट करण्‍याची धमकी देणारा अटकेत; तीन कॉल केले होते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - याकूबला फाशी दिली ना... हे चांगले केले नाही. आता नागपूरमधील महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवू, अशी धमकी देणारे तीन फोन अमरावती पोलिस नियंत्रण कक्षाला शुक्रवारी रात्री १.२० वाजेदरम्यान आले. हे फोन कुठून आले आणि ते कोणी केले याचा शोध घेऊन पोलिसांनी आज (रविवार) नागपूर जिल्ह्यातील नरखेड परिसरातून शाखरुख नावाच्‍या युवकाला ताब्‍यात घेतले.

अमरावतीच्या पोलिस आयुक्तांनी सांगितले की, फोन आल्यानंतर आम्ही पूर्ण गांभीर्याने माहिती घेण्यास सुरुवात केली. त्‍यात फोन क्रमांकाची माहिती आणि लोकेशन मिळाले. इतर माहिती घेणे सुरू आहे. दरम्यान, मिळालेल्‍या माहितीच्‍या आधारे एकाला अटक केली असून, नागपूर पोलिसांनाही या धमकीची माहिती देण्यात आली आहे.