आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून प्रकरणातील तिघे पोलिसांच्या ताब्यात,

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी तिघांना संगनमत करून एका १८ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना बुधवार २७ एप्रिल रोजी संकट मोचन परिसरातील नगर पालिकेच्या शाळेसमोर सायंकाळी घडली. जयप्रशांत नगरनाईक वय १८ रा. जांबरोड, यवतमाळ असे मृतकाचे नाव आहे. दरम्यान, आज गुरुवारी या प्रकरणातील आरोपी उत्तम अनंत जाधव, सौरभ महादेव काळे रा. संकटमोचन आणि तेजस संजय गायकवाड रा. भोसारोड या तिघांना वडगावरोड पोलिसांनी महागाव तालुक्यातील देऊरवाडी येथे अटक केली. प्राप्त माहितीनुसार, काहि दिवसापूर्वी उत्तम जाधव, सौरभ काळे आणि तेजस गायकवाड या तिघांसोबत वेगवेगळ्या कारणावरून जय नगरनाईक याने वाद घातला होता. दरम्यान २७ एप्रिल रोजी सकाळी उत्तम जाधव याला जयने मारहाण केली होती. त्यानंतर. बुधवारी सायंकाळी संकटमोचन परिसरातील नगर पालिकेच्या शाळेसमोर उभा असताना तिघांनीही जयवर हल्ला चढवून धारदार चाकूने त्याच्या पोटावर छातीवर सपासप वार करून त्याला ठार मारले. त्यानंतर तिघेही घटनास्थळावरून पसार झाले होते.