आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमरावती आगाराला तीन निमआराम गाड्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - खासगी लक्झरी ट्रॅव्हल्सशी स्पर्धा करण्यासाठी अमरावती एसटी आगारानेही पाऊल उचलले असून, या प्रयत्नांतर्गतच प्रवाशांना आरामात लांब पल्ल्याचा प्रवास करता येईल, अशा तीन नव्या निमआराम गाड्या आगाराला मिळाल्या आहेत.

लक्झरी ट्रॅव्हल्समध्ये असलेल्या सोयींप्रमाणे प्रवाशांना आरामदायक सुविधा पुरवण्याच्या दृष्टीने एसटीने हालचाली सुरू केल्या अाहेत. दोन गाड्या पुण्यासाठी, तर एक गाडी संतनगरी शेगावसाठी आहे. रोज सायं. वाजता पुण्यासाठी बस रवाना होते. ती सकाळी पर्यंत पुण्यात पोहोचते. तसेच दुसरी बस सायं. वाजता पुण्यातून निघून सकाळी पर्यंत अमरावतीत पोहोचते. त्याच प्रमाणे संतनगरी शेगावसाठी सकाळी वाजता ही बस अमरावतीहून निघते. ती सकाळी १०.३० ला शेगावला पोहोचते.

अल्पावधीतच प्रवाशांचा दोन्ही गाड्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या गाड्या मिळवण्यासाठी विभागीय नियंत्रक राजेश अडोकार यांनी सतत पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. मनोहर धजेकर हे आगार व्यवस्थापक म्हणून नुकतेच अमरावतीत रुजू झाले आहेत. याआधी ते चांदूर रेल्वे आगाराचे व्यवस्थापक होते. त्यांच्या दाेन वर्षांच्या कार्यकाळात या आगारात एकही अपघात झाला नाही. ते मेकॅनिकल आॅटोमोबाइल अभियंता असल्यामुळे ३४ वर्षांच्या सेवेचा अनुभव पणाला लावून नवे बदल करीत आहेत.
नव्या बसचे वैशिष्ट्य : हिरव्या रंगाच्या तिन्ही बसेसमध्ये पुशबॅक सीटची व्यवस्था अाहे. त्यामुळे प्रवास आरामदायक सुखकर होतो. जुन्या गाड्या ३९ सीट्सच्या होत्या.

अमरावती आगारामध्ये नवे बदल
अमरावती एसटी आगारात काही नवे बदल करण्यात आले असून, दुचाकी चारचाकी वाहनांना २४ तास स्थानकाच्या आत प्रवेशास मज्जाव करण्यात आला आहे. यासाठी दोन्ही द्वारांवर दोर बांधण्यात आला असून, गार्डही नियुक्त करण्यात आले आहेत. सोबतच कर्मचाऱ्यांचे मन प्रसन्न राहावे म्हणून फलकावर सुविचार लिहिले जातात. कुंड्या आणून त्या रांगोळ्यांनी सजवल्या जातात. त्याच प्रमाणे स्वच्छतेकडेही विशेष लक्ष दिले जात असून, कंत्राटी पद्धतीवर स्वच्छता केली जाते.
बातम्या आणखी आहेत...