आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर्यापूर तालुक्यात तीन आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दर्यापूर-चांदूर रेल्वे : दर्यापूर तालुक्यात विविध तीन घटनांमध्ये दोन युवकांसह एका वृद्ध शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. चांदुर रेल्वे तालुक्यातही आजारपणाला कंटाळून शेतकऱ्याने गळफास घेतल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली.

रामतीर्थ (ता. दर्यापूर) येथील निखिल मिलिंद धामोडे (वय १९) यानेे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास गावाबाहेरील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या आवारातील कडूनिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. मृतक निखिल हा प्रवासी अाॅटो चालवित होता. काही दिवसांपूर्वी आरटीओच्या पथकाने त्याच्या अॅटोवर कारवाई करून अाॅटो ताब्यात घेतला होता. बेरोजगार झाल्याने त्याने आत्महत्या केल्याची चर्चा गावात सुरू होती. येवदा पोलिसांनी घटनेची नोंद केली असून तपास सुरू आहे. दुसऱ्या घटनेत थिलोरी (ता. दर्यापूर) येथील विजय माणिकराव धर्माळे (वय ३६) या युवकाने मंगळवारी (दि. १३) सकाळी साडे सात वाजताच्या सुमारास घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मृतकाच्या मागे, आई-वडील भाऊ असा परिवार आहे. थिलोरी येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारु विक्री केली जाते. दारूमुळे सहा-सात युवकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मागील वर्षी गावातील महिलांनी दारूबंदीसाठी दर्यापुरात रास्तारोको आंदोलनही केले होते. परंतु गावातील दारूविक्री बंद झाल्यामुळे धर्माळेचा जीव गेल्याची चर्चा गावात सुरू होती. तिसऱ्या घटनेत उमरी नरसिंगपूर येथील राजाराम शेखुजी वानखडे (६४) या वृद्ध शेतकऱ्याने मंगळवारी सायंकाळी घरात गळफास घेतला. त्यांच्याकडे एकरभर शेत असून घटनेची नोंद दर्यापूर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
चांदूर रेल्वेत शेतकऱ्याने लावला गळफास
चौथ्याघटनेत आमला विश्वेश्वर (ता. चांदूर रेल्वे) येथील सुशील मारोतराव डोंगरे (वय ४२) या शेतकऱ्याने आजारपणाला कंटाळून मंगळवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. डोंगरे यांच्याकडे तेरा एकर शेती आहे. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. या आजारपणाला कंटाळून त्यांनी घरातील पाळण्याच्या दोरीचा गळफास घेतला. ही बाब रात्रीच त्यांच्या वडीलाच्या लक्षात आली. त्यांनी त्वरीत शेजाऱ्यांना बोलाविले. परंतु तोपर्यंत सुशीलचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मागे एक वर्षाचा मुलगा, चार वर्षाची मुलगी, पत्नी, वडील असा परिवार आहे.
बातम्या आणखी आहेत...