आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनयभंग करणाऱ्याला तीन वर्षांची शिक्षा, अल्पवयीन युवतीचा विनयभंग करून तिच्या भावाला केली होती मारहाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन युवतीचा विनयभंग करून तिच्या भावाला मारहाण केल्याची घटना तीन वर्षांपूर्वी घडली होती. या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायाधीश क्रमांक यांच्या न्यायालयाने दोष सिद्ध झाल्यामुळे विनयभंग करणाऱ्याला तीन वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. हा निर्णय न्यायालयाने गुरूवारी १२ जानेवारीला सुनावला. 
 
लखन उर्फ चंचल बाबुराव कदम (२७, रा. शिवाजीनगर, सूतगिरणीजगवळ, अमरावती) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. २७ डिसेंबर २०१३ ला अल्पवयीन युवती तिच्या घरासमोर उभी होती. त्यावेळी लखन हा तिथे गेला त्याने तिचा विनयभंग केला. बहिणीसोबत लखन असभ्य वर्तन करत असल्याचे पाहून युवतीच्या भावाने त्याला समजावले असता त्यालाही लखनने शिवीगाळ करून मारहाण केली. 
 
या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी लखनविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार अधिनियम, विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. राजापेठ पोलिसांनी प्रकरणाचा तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान लखनने गुन्हा केल्याचे सिद्ध झाल्यामुळे न्यायालयाने त्याला विनयभंग प्रकरणात महिने, बाल लैंगिक अत्याचार अधिनियमाप्रमाणे वर्ष शिक्षा दोन हजार दंड, दंड भरल्यास महिना अतिरिक्त कारावास सुनावला. या प्रकरणात शासकीय पक्षाकडून अॅड. तापडीया यांनी युक्तीवाद केला तर पैरवी अधिकारी म्हणून हवालदार बाबाराव मेश्राम यांनी कामकाज पाहिले, अशी माहिती पोलिस आयुक्तालयाच्या सीएमसीसेलकडून दिली आहे. दरम्यान, शहरात विनयभंग करण्याच्या घटनांत वाढ झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. 

भावाने त्याला समजावले असता त्यालाही लखनने शिवीगाळ करून मारहाण केली. या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी लखनविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार अधिनियम, विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. राजापेठ पोलिसांनी प्रकरणाचा तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान लखनने गुन्हा केल्याचे सिद्ध झाल्यामुळे न्यायालयाने त्याला विनयभंग प्रकरणात महिने, बाल लैंगिक अत्याचार अधिनियमाप्रमाणे वर्ष शिक्षा दोन हजार दंड, दंड भरल्यास महिना अतिरिक्त कारावास सुनावला. या प्रकरणात शासकीय पक्षाकडून अॅड. तापडीया यांनी युक्तीवाद केला तर पैरवी अधिकारी म्हणून हवालदार बाबाराव मेश्राम यांनी कामकाज पाहिले, अशी माहिती पोलिस आयुक्तालयाच्या सीएमसीसेलकडून दिली आहे.