आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाव तसं चांगलं, पण नावामुळे ‘वेशीला टांगलं’!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - थोर नाटककार शेक्सपियरने भलेही ‘नावात काय आहे?’ असा प्रश्न विचारला असेल; पण भारतासारख्या बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक समाज असलेल्या देशात काेणत्याही व्यक्ती वा वस्तूच्या नावाला फारच महत्त्व अाहे. याचा प्रत्यय नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील छाेट्याशा गावातही येत अाहे. ‘थुगावदेव’ येथील गावकऱ्यांना अापल्या गावाचे नाव तुच्छतादर्शक व अपमानास्पद वाटते. त्यामुळे या गावाचे नावच बदलण्याची मागणी त्यांनी सरकार दरबारी लावून धरली अाहे. त्यासाठी ग्रामसभेत ठरावही संमत केला अाहे.
अामच्या गावाचे नाव ‘थुगावदेव’ हे बदलून ते ‘देवग्राम’ असे करण्यात यावे, अशी येथील ग्रामस्थांची मागणी अाहे. गावाचे सरपंच व सचिवांनी यासाठी २०१२ पासून म्हणजे गेल्या चार वर्षांपासून शासनस्तरावर पत्रव्यवहार आणि पाठपुरावा सुरू केला आहे. ग्रामसभेत तसा रीतसर प्रस्ताव पारित करून िजल्हाधिकाऱ्यांकडेही पाठवला आहे. यावर काटोलचे उपविभागीय अधिकारी तसेच िजल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी अहवाल सादर केले. तहसीलदार व मंडळ अधिकाऱ्यांनीही चौकशी केली. त्यानंतर प्रस्ताव मंत्रालयात गेला. तिथून ‘त्रूटीपूर्तता करून नव्याने अहवाल सादर करावा’ असे पत्र सामान्य प्रशासन विभागाच्या कक्ष अधिकाऱ्याने पाठवले अाहे. मात्र, गावकरी अजूनही हार मानायला तयार नाहीत. मंत्रालयाने उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या उत्तरांसह नव्याने आता प्रस्ताव सादर करण्यात येत आहे. त्यानुसार गावातील पोस्टमास्तरांनी ‘देवग्राम’ नामकरण करण्यास हरकत नसल्याचे नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे. ‘थुगावदेव’ हे महसुली गाव म्हणून कधी अस्तित्वात आले याचा काहीही पुरावा नाही.

१०४ वर्षांपूर्वीचे नाव
स्वातंत्र्यापूर्वी मध्य प्रदेश शासन काळातील बंदोबस्त मिसळमधील नमुना एस-१२ मध्ये मालगुजार नंबरदार यांनी ७ जानेवारी १९१६ रोजी मालगुजारी सारा वसुली सरकारजमा करण्याबाबतच्या करारनाम्यात या गावाचे नाव थुगाव असल्याचे नमूद केले. हे गाव बंदोबस्त मिसळ १९१२ तयार होण्यापूर्वीपासून अस्तित्वात असल्याचेही त्यात नमूद अाहे. याशिवाय १९५४-५५ च्या अभिलेख पंजीनुसार गावाचे ‘थुगावदेव’ हेच नाव अस्तित्वात असल्याची नाेंद अाहे.

नामकरणासाठीचा प्रवास
- २६ जानेवारी २०१२ : सरपंच व सचिवांचा अर्ज
- २६ जानेवारी २०१२ व १५ आॅगस्ट २०१३ : ग्रामसभेत ठराव
- ३० जुलै २०१५ : नरखेड तहसीलदार यांनी जाहीरनामा काढला.
- १५ आॅगस्ट २०१५ : मंडळ अधिकाऱ्यांचा अहवाल.
- २४ आॅगस्ट २०१५ : नरखेड तहसीलदारांचा अहवाल.
- १२ मे २०१६ : कक्ष अधिकाऱ्यांच्या पत्रानुसार तहसीलदारांचा सुधारित अहवाल
- ७ जून २०१६ : नागपूर िजल्हा परिषदेचा सुधारित अहवाल
बातम्या आणखी आहेत...