नागपूर - महाराष्ट्राचा व्याघ्रदूत (टायगर अॅम्बेसेडर) होण्यास महानायक अमिताभ बच्चन यांनी संमती दिल्यावर आता भारतरत्न सचिन तेंडुलकर यानेदेखील त्यासाठी तयारी दर्शवली आहे. सचिनला कोणती जबाबदारी द्यायची याचा निर्णय लवकरच त्यांच्याशी चर्चा करून घेतला जाणार असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
राज्यातील व्याघ्र पर्यटनाला चालना मिळण्यासह "वाघ वाचवा' मोहिमेला बळ मिळावे यासाठी मुनगंटीवार यांनी २९ जुलै रोजी महानायक अमिताभ बच्चन आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या दोघांनाही पत्र पाठवून राज्याचे व्याघ्रदूत होण्याची विनंती करण्यात आली होती. बच्चन यांनी सर्वप्रथम त्याला प्रतिसाद देऊन व्याघ्रदूत होण्यास संमती दिली आहे. त्यानंतर १३ ऑगस्ट रोजी सचिननेदेखील वनमंत्र्यांना पत्र पाठवून या क्षेत्रात काम करण्याची तयारी दर्शवली आहे.