आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tipeshwar Hapasi Point's 40 Per Cent Jungal Burned

टिपेश्वरच्या हापसी पॉइंटचे ४० टक्के जंगल झाले खाक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्यातील हापसी पॉइंट परिसरात रहस्यमयरीत्या आग लागली. या आगीमध्ये परिसरातील जवळपास ४० टक्के भाग जळाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे यंदा याच भागात सर्वाधिक वाघ दिसून आल्याचे सांगण्यात येते.

यासंदर्भात सध्यातरी वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अधिकृत माहिती दिली नाही. मात्र, प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे. आग लागल्याची बाब आज, १९ रोजी उघडकीस आली, हे विशेष. यंदा कधी नव्हे ते टिपेश्वर अभयारण्यात सर्वाधिक वाघ पर्यटकांना दिसले. परिणामी, वन विभागाने जंगल सफारी करण्यासाठी ऑनलाइन बुकिंग सुरू केली होती. तरीसुद्धा मोठ्या प्रमाणात नागरिकांनी टिपेश्वरमध्ये जाऊन प्रत्यक्ष वाघांचे दर्शन घेतले.
वाघकुठे गेले असावे? : याबाबतवन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा दुजोरा दिला नाही. विशेष म्हणजे याच भागात वाघांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात होते. अशा परिस्थितीत वाघ नेमके गेले कुठे, हा प्रश्न उपस्थित होत आहे. एकंदरीत आग नेमकी लागली कुठल्या कारणाने याची कारणमीमांसा होणे गरजेचे आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे.
सफाईदरम्यानदिसली आग : पर्यटकांचीगर्दी वाढत असल्यामुळे काही दिवसांपासून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी साफसफाई करणे सुरू केले होते. आज, १९ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास अभयारण्यातून धूर येत असल्याची बाब कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली. दरम्यान, सर्वांनी आतमध्ये जाऊन बघितले असता, परिसरातील बहुतांश भाग हा आगीने वेढला होता. अशा परिस्थितीत आग विझवण्याचा प्रयत्न विभागाने सुरू केला. तरीसुद्धा हापसी पाॅइंट परिसरातील जवळपास ४० टक्के भाग आगीत जळाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.