आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरासाठी आजचा दिवस ‘बिझी संडे’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह चार मंत्री, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर उद्या,रविवारी शहरातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार अाहे. यामुळे सुटी असूनही जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी आणि पोलिस विभागाकरिता रविवारचा दिवस हा ‘बिझी संडे’ म्हणूनच गणला जाणार आहे. फडणवीस,गडकरी यांच्यांसमवेत चार मंत्री, आमदार, खासदार येणार असल्याने मंत्र्यांची मांदियाळी शहरात राहणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात सकाळी ९.३० वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर नांदुरा (बु.) येथील गोरक्षण संस्थेच्या गोकूलमचे लोकार्पण मुख्यमंत्री करणार आहेत.दुपारी १२ वाजता कृषी विकास प्रतिष्ठानच्या कृषी प्रदर्शन आणि कार्यशाळेच्या उद््घाटनाला फडणवीस आणि गडकरी उपस्थित राहणार आहेत. याच कार्यक्रमात राज्याचे परिवहन मंत्री दिवाकरराव रावते, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे, महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांची उपस्थिती राहणार आहे. दुपारी वाजता संत कवंरराम धामच्या भूमिपूजन सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीस आणि गडकरी उपस्थित राहणार आहेत.
सिंधी समाजाचे दैवत संत कंवरराम यांचे भव्य मंदिर अमरावतीपासून सात ते आठ किलोमीटर अंंतरावर छत्री तलाव ते भानखेडा मार्गावर १४ एकर परिसरात १०० कोटी रुपये खर्च करून उभारले जाणार आहे. या कोनशिला सोहळ्यालासिंधी समाजाचे देशभरातील नामवंत उद्योजक, व्यावसायिक मंडळी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या दरम्यानच नितीन गडकरी हे दुपारी ११:३० वाजता त्यांचे मामा गजाननराव रहाटगावकर पांडे यांच्या निवासस्थानी भेट देणार आहे.

सुरक्षायंत्रणेची कसरत
फडणवीस आणि गडकरी यांच्या बेलोरा विमानतळावर होणाऱ्या आगमनापासून ते परत जाईपर्यंत शहरातील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांना कसरत करावी लागणार आहे. मुख्यमंत्री नितीन गडकरी या दोघांनाही झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था असल्याने शहरात पोलिसांचाही कडेकोट बंदोबस्त राहणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

तालुका पडीक जमीन क्रीडांगणाखालील अतिक्रमित क्षेत्र जमीन
अमरावती १९५७.५३ १७.८५ ६.६५
भातकुली १९५२.६ ५.९७ २८.५६
नांदगाव खं. १४२५.८४ १२.३४ ००
चांदूर रेल्वे १०१९.६७ ७.६१
धामणगाव १३०७.६२ १५१.१३ ६७२०.९
तिवसा २२२९.८९ २.८
मोर्शी २६६२.७६ ९.७१ २.८२
वरुड ३८७५.३५ ४.१३ ००
अचलपूर २७१५.९३ ९.०५ १९.४१
चांदूर बाजार १३७७.९३ ७.९ २९.९७
दर्यापूर २३२६.०९ ५७.०६ १६१.०६
अंजनगाव ९१२.७२ १.४६ १५.३६
धारणी ४९६३.३७ ०० १९४९.७९
चिखलदरा ३४९९.४१ २.३३ ००
एकूण ३२२२६.७१ २८९.३४ ८९३८.५२