आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेदवारी मागे घेण्याचा आज मनपासाठी अंतिम दिवस, निवडणुकीचे चित्र आज होणार स्पष्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महापालिका निवडणुकीतून माघार घेण्याची अंतिम तारीख मंगळवार फेब्रुवारी आहे. दुपारी वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेतल्यानंतर महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी फेब्रुवारीपर्यंत एकूण ७९१ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. अवैध तसेच नामांकन मागे घेतल्यानंतर सद्यस्थितीत ७०२ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 

महापालिकेतील ८७ जागांसाठी मंगळवार २१ फेब्रुवारीला मतदान घेतले जाणार आहे. याकरीता २७ जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान ऑनलाइन नामांकन अर्ज प्रक्रिया राबविण्यात आली. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस तसेच शिवसेनेकडून उमेदवाऱ्यांच्या याद्या घोषित करण्याबाबत बरीच गुप्तता बाळगण्यात आली. या प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारीबाबत नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सर्वत्र रोमांच कायम होता. त्यामुळे शेवटच्या दोन दिवसात मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. सुरुवातीचे चार दिवस एक ही ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नव्हता. फेब्रुवारीपासून काही प्रमाणात ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात झाली. नामांकन दाखल करण्याच्या अंतिम दिवशी फेब्रुवारीला सहाशेच्या वर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यामुळे एकूण नामांकनांची संख्या ७९१ वर पोहोचली होती. फेब्रुवारीला नामांकनाची छाननी करण्यात आल्यानंतर ५८ अर्ज अवैध ठरलीत. शिवाय दोन ठिकाणी नामांकन दाखल करणाऱ्या उमेदवारांनी एका जागेसाठी अर्ज कायम ठेवत अन्य ठिकाणाहून उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. त्यामुळे सद्यस्थितीत निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांची संख्या ७०२ ऐवढी आहे. नामांकन अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख फेब्रुवारी असून त्यानंतर महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. शिवाय प्रभागनिहाय जागांमध्ये कोणामध्ये प्रमुख लढत होईल, याचे अंदाज देखील बांधले जाण्याची शक्यता आहे. 

मतदारांच्या गाठीभेटींवर इच्छुक उमेदवारांचा भर 
उमेदवारीअर्ज दाखल केल्यानंतर सर्वच उमेदवारांनी मतदारांच्या भेटी गाठी घेणे सुरू केले आहे. नामांकन मागे घेण्याची प्रक्रिया संपल्यानंतर बुधवार फेब्रुवारीला चिन्हांचे वाटप केले जाईल. त्यानंतर निवडणुकीच्या प्रचारात रंगत येणार आहे. एकूणच महापालिका निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती झाली असून, अनेक इच्छुकांनी आतापासूनच प्रचाराच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. मंगळवारी माघार घेतल्यानंतर चित्र स्पष्ट होईल. 

प्रचाराचा उडणार बार बुधवारपासून 
महापालिका निवडणुकीसाठी चिन्हांचे वाटप झाल्यानंतर बुधवार फेब्रुवारीपासून महापालिका निवडणुकीसाठी प्रचाराचा धुराडा उडणार आहे. बुधवारी सकाळी ११ वाजेपासून निवडणूक झोन कार्यालयात राजकीय पक्ष वगळता अपक्षांना चिन्हांचे वितरण केले जाणार आहे. चिन्हांचे वितरण झाल्यानंतर उमेदवारांची प्रत्यक्ष प्रचाराची धावपळ सुरू होणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...