आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हापूस आंब्याचा रस यंदा महागला , गत दोन वर्षांपेक्षा यंदा आंब्याची आवक फारच कमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - उन्हाळा आला की, खवय्यांना फळांचा राजा आंब्याची आठवण होते. त्यातही हापूस आंब्याची बातच काही और अाहे. परंतु, हापूस आंब्याचा रस यंदा चांगलाच महाग आहे. गत दोन वर्षांपेक्षा यंदा आंब्याची आवक फारच कमी म्हणजे साधारणत: २० टक्क्यांच्या जवळ असल्यामुळे आंब्याचे विशेषत: हापूसचे भाव चांगलेच तेजीत असल्यामुळे यंदा खवय्यांना हापूसची तहान इतर आंब्यांच्या रसांवर भागवावी लागणार आहे.
गेली दाेन वर्षे आंब्याची आवक फारच चांगली होती. कारण हापूस आंब्याच्या निर्यातीवर बंदी होती. त्यामुळे चौकाचौकांत आंब्याच्या पेट्या विक्रीसाठी ठेवलेल्या दिसायच्या. हापूस आंब्याचा रस खाणाऱ्यांची त्या वेळी चांगलीच चंगळ झाली. मात्र, यंदा आवक कमी असल्यामुळे अगदी हापूसपासून ते बेगनपल्लीपर्यंत सर्वच आंब्यांचे भाव कडाडले आहेत. त्यामुळे आंबा बघितला की उर्वरितपान

असे आहेत हापूस आंब्याचे दर
अांबा प्रकार ठोक बाजार चिल्लर बाजार
देवगडहापूस ६००~ डझन ८०० ते हजार रु. डझन
बंगळुरू हापूस १००~ किलो १५० ते २०० ~किलो
आंध्रा हापूस १००~ किलो १५० ते २०० ~किलो
लालबाग ५०~ किलो ८० ~किलो
बेगनफल्ली ७०~ किलो १०० ~किलो
चर्कुलस ६०~ किलो १०० ~किलो
आंब्याची आवक २० टक्केच

हापूस आंब्याचा रस यंदा महागला
यंदा आंब्याची आवक २० टक्के आहे. वादळाचा आंब्याला तडाखा बसल्यामुळे यंदा भावही तेजीत आहेत, तरीही मागणी वाढत आहे. - काझी हुस्नोद्दीन, ठोकविक्रेता, दावत फ्रुट कंपनी.