आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसस्थानकाचे आज राजापेठेत उद्घाटन, वाढत्या गर्दीमुळे होणार नाही प्रवाशांची गैरसोय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अडथळ्यांच्या शर्यती पार करीत अखेर राजापेठ बस स्थानकाच्या उद््घाटनाचा शुभ मुहूर्त परिवहन महामंडळाला सापडला असून, सोमवारी १८ एप्रिलला राजापेठ बस स्थानकाचे उद्घाटन राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते सकाळी ११.०० वाजता होणार आहे.
उदघाटनानंतर बस फेऱ्यांना सुरुवात होणार असून, प्रवाशांच्या अंगवळणी पडेपर्यंत राजापेठ स्थानकावरून सुटणाऱ्या गाड्या एक आठवडा मध्यवर्ती बस स्थानकावरही (सायन्सकोर मैदानापुढील) येतील, त्यानंतर मात्र राजापेठ बस स्थानकावरून उर्वरितपान
अमरावती शहरात नव्याने उभारण्यात आलेले राजापेठ बसस्थानक.

प्रवाशांची गर्दी ताण होणार कमी
^सध्या मध्यवर्ती बस स्थानकावरील जागा अपुरी असल्यामुळे येथे प्रवाशांची गर्दी वाढली आहे. तसेच बस फेऱ्यांचाही अतिरिक्त ताण आहेच. राजापेठ बस स्थानकामुळे दोन्हीही कमी होण्यास मदत मिळेल. मनोहर धजेकर, आगार व्यवस्थापक.

प्रवाशांची विशेष सोय
अंगवळणी पडेपर्यंत शहरांकडे जाणाऱ्या गाड्या मध्यवर्ती स्थानकावरून जाणार असल्या तरी नागपूर वगळता इतर शहरांसाठी जाणाऱ्या गाड्या राजापेठ स्थानकावरून सुटतील. नागपूरला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या बघता बसेस राजापेठ स्थानकावरून सुटणार असल्या तरी त्या मध्यवर्ती स्थानकावरून जातील, येतील. त्या स्थानकात जाणार नाहीत.

३० टक्के ताण कमी
राजापेठ बस स्थानक सुरू झाल्यानंतर मध्यवर्ती बस स्थानकावरील ३० टक्के ताण कमी होईल. मध्यवर्ती बस स्थानकावरील गर्दी वाढली होती. प्रवाशांच्या गर्दीमुळे हाल व्हायचे, येथील जागा अपुरी पडायची. शहरांकडे जाणाऱ्या बसेस राजापेठवरून सुटणार असल्यामुळे मध्यवर्ती स्थानकावरील ताण गर्दी दोन्हीही कमी होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...