आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त ठिकठिकाणी आज सोहळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जय जिजाऊचा जयघोष करीत राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त मंगळवारी (दि. १२) शहरात ठिकठिकाणी सोहळा साजरा करण्यात येणार आहे. जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त प्रादेशिक वाहतूक कार्यालयाजवळील जिजाऊ चौकात वीरमाता माँ जिजाऊ यांच्या कर्तृत्व, दातृत्व चरित्राला अभिवादन करण्याकरिता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा सकाळी ८.३० वाजता साजरा करण्यात येणार आहे. मराठा सेवा संघातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

या वेळी मराठा सेवा संघाच्या वतीने जिजाऊ यांचा पुतळा स्वच्छ पाण्याने धुऊन आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला जाईल. सभोवतालच्या परिसराला रंगरंगोटी करून जिजाऊ यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले जाईल. या वेळी छोटेखानी कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. याशिवाय जिजाऊ बँकेत सकाळी ११ वाजता जिजाऊ यांचे पूजन केले जाणार असल्याची माहिती बँकेचे व्यवस्थापक हरीश नाशिरकर यांनी दिली.

सिंदखेडराजाला आज आगळावेगळा सोहळा
राष्ट्रमाताजिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी सिंदखेडराजा येथे झाला. तेथील मातृतीर्थावर जवळपास ४५० एकर जागेवर ११ हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावित खर्चामधून जिजाऊसृष्टी प्रकल्प तयार होत आहे. याठिकाणी दरवर्षी १२ जानेवारीला आगळ्यावेगळ्या पद्धतीने जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात येतो.

अमरावतीतूनही जाणार कार्यकर्ते
बुलडाणातालुक्यातील सिंदखेडराजा येथे दरवर्षी जिजाऊ जन्मोत्सव उत्साहात साजरा केला जातो. राज्यभरातून शेकडो जिजाऊभक्त या सोहळ्याला उपस्थित राहतात. यंदाही अमरावती जिल्ह्यातून जिजाऊ ब्रिगेडचे पदाधिकारी कार्यकर्ते या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, जन्मोत्सव कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी शहरातील काही कार्यकर्ते सोमवारी सायंकाळी निघाले. तर, काही कार्यकर्ते मंगळवारी सकाळी जाणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...