आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शौचालय घोटाळ्याची आता फेरचौकशी होणार,उपमुख्य कार्यकारी अधिकारी महागावात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महागांव- तालुक्यात सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत सन २०१३-१४ या शैक्षणिक वर्षात ५६ जिल्हा परिषद शाळांना शौचालय उभारणी करीता ७० लाख रुपये निधी देण्यात आला परंतू यातील अनेक शौचालय कागदोपत्री तर काही शौचालय अतिशय निकृष्ट दर्जाचे बांधण्यात आले असून या मध्ये ३० लाखांचा अपहार करण्यात आला. याप्रकरणाची फेरचौकशी होणार असून यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी महागावात दाखल झाले आहेत.

शौचालय घोटाळ्याची जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आरती फुपाटे यांनी गांभीर्याने दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले होते. त्यावेळी यवतमाळ जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांनी थातूरमातूर चौकशी केली होती, तेव्हा जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून अभियंत्यांची पथके महागाव तालुक्यात दाखल झाले होते. मात्र त्यांनीसुद्धा भ्रष्ट शिक्षकांच्या तर्फे अहवाल सादर केल्यामुळे आर्णी येथील जि. प. सदस्य प्रवीण शिंदे यांनी सादर केलेला अहवाल फेटाळून लावला शौचालय घोटाळ्याची नव्याने चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यामुळे २० ऑगस्ट रोजी या प्रकरणाच्या फेरतपासणीसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार महागाव येथे दाखल झाले. त्यांनी आज उंटी , भांब , महागाव शहरातील जि. प. हायस्कूल येथील शौचालयाची पाहणी केली. या शौचालय उभारणीकरीता लाख रुपये प्रमाणे ५६ शाळांना ७० लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. यातील दुरूस्तीची टक्के रक्कम वजा करून ९५ हजार रुपये संबंधित मुख्याध्यापकांच्या खात्यात वर्ग करण्यात आले होते. मात्र बांधलेली सर्व शाैचालय निकृष्ट दर्जाची बांधण्यात आल्याचे दिसून आले. यासंदर्भात पाठवलेल्या अहवालावरून तत्कालीन बीओ , संबंधित शिक्षक ,बांधकाम अभियंता यांनी संगनमत करून ३० लाखांचा आपहार केल्याचे समजले आहे. आज करण्यात आलेल्या पाहणीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यानी या कामात अनियमीतता असल्याचे स्पष्ट केले असून दोषींविरुद्ध कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.
बातम्या आणखी आहेत...