आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोल कर्मचा-याला थप्पड लावल्याने आमदार राजेश काशिवार यांना मारहाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- टोलनाक्यावर व्हीआयपी गेट बंद असल्याने उद्भवलेल्या वादातून भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश उर्फ बाळ काशिवार यांना नागपूर जिल्ह्यातील मौदा (माथनी) टोल नाक्यावरील सहा ते सात कर्मचाऱ्यांनी मारहाण केली. या प्रकरणात मौदा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईत विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. विधिमंडळाच्या सत्राला शनिवारी आणि रविवारी सुटी असल्याने आमदार काशिवार हे साकोलीला जाण्यासाठी मुंबईहून नागपुरात विमानाने दाखल झाले. यानंतर ते स्वत:च्या कारने साकोलीला निघाले. दुपारी 3.30 च्या सुमारास ते मौदा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माथनी टोल नाक्यावर पोहोचले. त्या वेळी टोल नाक्यावरील व्हीआयपी गेट दुरुस्तीसाठी बंद होते. हे गेट बंद असल्यासंदर्भात आमदारांनी टोल नाका प्रशासनाला विचारले. त्यावरून आमदार आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली.
यानंतर आमदारांनी एका कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली. त्यामुळे चिडलेल्या कर्मचाऱ्यांनी आमदारांना मारहाण केली. यात आमदार काशिवार यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचाराकरिता प्रथम मौदा येथील ग्रामीण रुग्णालय आणि नंतर भंडारा येथील सामान्य रुग्णालयात हलवले आहे. पोलिसांत दोन्ही बाजूंनी परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.
पुढे छायाचित्राच्या माध्यमातून पाहा, राजेश काशिवार यांचा फॅक्चर झालेला हात...
बातम्या आणखी आहेत...