आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्याचा बुधवार ठरणार वर्षातील सर्वात मोठा दिन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पृथ्वीही सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असते. या परिक्रमेत पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास लागणाऱ्या वेळेमुळे २१ जून रोजी १३ तास १३ मिनिटांचा दिवस असतो. त्यामुळे २१ जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. याच दिवशी उत्तरायण संपून दक्षिणायणास सुरुवात होते, अशी माहिती हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली आहे. 
 
दरवर्षी २१ जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. पृथ्वी अक्षवृत्त २३.५ अंशाच्या झुकावाने ११ हजार कि.मी. प्रती तास वेगाने पश्चिमेकडून पूर्व दिशेला फिरत असते. या सोबतच पृथ्वी आपल्या कक्षेतून लाख हजार कि.मी.प्रतितास वेगाने ८९ कोटी ४० लाख कि.मी. लंब वर्तुळाकार कक्षेत सूर्याची परिक्रमा करते. वर्षातील जसा मोठा दिवस असतो तसेच वर्षातील लहान दिवस २२ डिसेंबर असतो. या दिवसापासून दक्षिणायन संपून उत्तरायणाला सुरुवात होत असते. 
इंटरनॅशनल अर्थ रोटेशन अॅण्ड रेफरन्स सिस्टीम सर्व्हीस ही आंतरराष्ट्रीय संघटना लिप सेकंद अॅडजेस्ट करीत असते. ३० जूनच्या मध्यरात्री किंवा ३१ डिसेंबरच्या मध्य रात्री लीप सेकंद अॅडजेस्ट करावा लागत आहे, कारण पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याचा वेग हा तीन मायक्रोसेकंदाने कमी झाला आहे. 

पृथ्वीचा सूर्याभावेती फिरण्याचा वेग दिवसेंदिवस होतोय कमी 
पृथ्वीचा सूर्याभोवती फरण्याचा वेग हा कमी होत आहे. २००४ मध्ये दक्षिण भारतातील त्सुनामीमुळे पृथ्वीच्या फिरण्याचा वेग हा मायक्रोसंकदाने कमी झाला. पृथ्वीच्या फिरण्याचा वेग हा कमी होत असल्याने ठराविक वर्षानंतर आंतरराष्ट्रीय घड्याळीत लीप सेकंद जुळवावे लागतात. 
 
बातम्या आणखी आहेत...