आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेकडो विद्यार्थ्यांची एसटीच्या विभागीय कार्यालयात ‘शाळा’, उद्यापासून एस टी बसफेरी होणार सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - नांदगावखंडेश्वर तालुक्यातील वाघोडा, शेलू, फुबगाव यासह इतरही काही गावांच्या मुलांना सातवीनंतर शिक्षणासाठी नांदगाव खंडेश्वरला यावे लागते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी महामंडळाच्या महीनेवारी पासेस काढल्या आहेत, या गावांमधून जवळपास दोनशे ते अडीचशे विद्यार्थी नांदगावला दरदिवशी येतात, मात्र या विद्यार्थ्यांसाठी अवघी एकच एसटी बस आहे. ती सुध्दा वेळेवर येत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
ही समस्या मागील अनेक महिन्यांपासून आहे. मात्र महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी यावर तोडगा काढला नव्हता. दरम्यान मंगळवारी (दि. १३) शेकडो विद्यार्थीनी विद्यार्थी एसटीच्या विभागीय नियंत्रकांच्या कक्षात पोहचल्या. या मार्गावर अतिरिक्त बस सुरू केल्याशिवाय आम्ही या ठिकाणाहून जाणार नाही, अशी भूमिका घेतल्यामुळे विभागीय नियंत्रकांनी तातडीने गुरूवारपासून (दि. १५) बसेस सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जवळपास दिडशे विद्यार्थी युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश मारोडकर यांच्या नेतृत्वात मंगळवारी विभागीय नियंत्रकाच्या कक्षात आले होते. तालुक्यातील वाघोडा, शेलू, फुबगाव, सुलतानपूर या गावच्या विद्यार्थ्यांना शाळेत नांदगावला येण्यासाठी सकाळी खरबी ते बडनेरा ही एकच बस आहे. एका बसमध्ये अडीचशे ते तीनशे विद्यार्थी बसू शकत नाही. मात्र जे विद्यार्थी बसमध्ये येतात, त्यापैकी अनेकजण जीव धोक्यात घालून कसेबसे एसटीच्या फाटकाजवळ उभे राहून येतात. इतकी गर्दी बसमध्ये असते. त्यामुळे तातडीने चांदूर रेल्वे- बेलोरा ही बस सुरू करावी, यासोबत अन्य बसेस सुरू करण्याचीही मागणी केली आहे. नांदगाव खंडेश्वर येथे यवतमाळकडे जाणाऱ्या यवतमाळ वरून अमरावती कडे येणाऱ्या प्रत्येक विना वाहक बसला थांबा द्यावा, तसेच पापळ वाढोणा ते चांदूर रेल्वे जाणारी बस सुरू करावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली. निवेदन घेऊन आलेल्या विद्यार्थी शिवसैनिकांनी विभागीय नियंत्रक आर. यु. अडोकार यांच्यासोबत चर्चा केली. प्रकरणाचे गांभीर्य विद्यार्थ्यांनी मांडलेले वास्तव लक्षात घेता त्यांनी गुरूवारपासून अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्याचे आदेश दिले आहे. तसे लेखी पत्र आंदोलनकर्त्यांना सुध्दा दिले.

यावेळी प्रकाश मारोटकर, श्रीकृष्ण सोळंके, शिवानी मेश्राम, भावेश भांबुरकर, सागर सोनोने, पंकज रामगावकर, सोपान घनमोळे, राहुल दुर्गे, चेतन धवने, अभय बनारसे, आकाश काकडे, शंरराव तुपटकर यांच्यासह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.
एसटी बस फेऱ्यां अभावी विद्यार्थ्यांचे होतेय शैक्षणिक नुकसान
-विद्यार्थ्यांना शाळेसाठीनांदगाव खंडेश्वरला यावे लागते. मात्र बसेस अभावी त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. महिन्यांपुर्वी आम्ही निवेदन दिले मात्र त्याची दखल घेतली नव्हती. त्यामुळे मंगळवारी शेकडो विद्यार्थ्यांसह विभागीय नियंत्रकाकडे आलो. विभागीय नियंत्रकांनी तातडीने बस फेऱ्या सुरू करण्याबाबत लेखी दिले. प्रकाशमारोटकर,जिल्हाप्रमुख, युवासेना
एसटी विभागीय नियंत्रकांच्या कक्षात जमलेले विद्यार्थी शिवसैनिक.
या एसटी बस फेऱ्या होणार आहेत सुरू
सकाळी १० वाजता बेलोरा येथे पोहचणारी सायंकाळी परत येणारी फेरी नांदगाव खंडेश्वर वरून सुरू करण्यात येईल. तसेच चांदुर रेल्वे ते कारंजा ही बस फेरी आणि दुपारी सायंकाळी वाजता नांदगाव खंडेश्वर वरून जाणारी बसफेरी गुरूवारपासून सुरू करण्यात येणर असल्याचे पत्रात नमूद केले आहे.
बातम्या आणखी आहेत...