आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रॅक्टरच्या धडकेत युवा शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रोफाइल फोटो - Divya Marathi
प्रोफाइल फोटो
बाभूळगाव - युवा शेतकरी शेतामधून घराकडे परत येत असताना मागून आलेल्या ट्रॅक्टरने त्याला निसटती धडक दिली. त्यामुळे तो जमिनीवर पडल्यानंतर त्याच्या अंगावरून ट्रॉलीचे चाक गेल्याने तो जागीच गतप्राण झाला.ही घटना सौजना येथे बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. रोशन बोबडे (३२ रा.सौजना) असे मृतक युवा शेतकऱ्याचे नाव आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोशन बोबडे हा नेहमीप्रमाणे पहाटेच्या सुमारास आपल्या शेतात काम करण्यासाठी गेला होता. आष्टारामपूर ते सौजना या रस्त्यावर त्याचे शेत आहे. दरम्यान, शेतातील काम आटोपून सकाळी ११ वाजताच्या सुमारास रोशन जेवण करण्यासाठी पायी घरी परत येत होता. त्यावेळी मागाहुन आलेल्या ट्रॅक्टर क्रमांक एमएच २७-४३३१ ने त्याला धडक दिली. त्या धडकेत तो रस्त्यावर खाली पडला. अशात ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक त्याच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मृतक रोशनचा भाऊ रूपेश बोबडे (३० ) याने बाभुळगाव पोलिस स्टेशनला फिर्याद नोंदविली. यावरून पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. दरम्यान, पोलिस निरीक्षक अनिल पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला अाहे. 
 
बातम्या आणखी आहेत...