आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Trader Murdered In Amravati City, Hotel Owner Along WIth Other Injured

मध्यस्थी करणाऱ्या व्यापाऱ्याचा खून, हॉटेलमालकासह इतर जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: व्यापाऱ्याचा खून झाल्यानंतर साबनपुरा परिसरात असा पोलिस बंदोबस्त होता.
अमरावती - खोलापुरीगेट परिसरातील कुख्यात उमेश आठवले हा रविवार, 1 नोव्हेंबर रोजी रात्री टांगापाडाव ते गांधी चौक मार्गावरील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेला होता. या वेळी उमेश आठवलेचा हॉटेल मालकासोबत वाद झाला. उमेश हा हॉटेलचालकाला मारत असल्याचे पाहून बाजूलाच बसलेल्या व्यापाऱ्याने त्याच्या काही मित्रांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.
त्या वेळी उमेश त्याच्या चार सहकाऱ्यांनी त्या व्यापाऱ्यावर हल्ला चढवला. यामध्ये व्यापाऱ्याचा मृत्यू झाला, तर हॉटेलमालकासह व्यापाऱ्याचे सहकारी जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी पाचही मारेकऱ्यांना अटक केली. मात्र, व्यापाऱ्याच्या मृत्यूमुळे सोमवारी दुपारी संतप्त नागरिकांनी बाजारपेठ बंद करण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळी टांगापाडाव, साबनपुरा परिसरात चांगलाच तणाव निर्माण झाला होता. या वेळी परिसरात तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. चिंटू ऊर्फ मुशीर आलम नियाज अली (३५, रा. साबनपुरा) असे हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. याच वेळी तनवीर आलम नियाज अली (४०), बाबा उर्फ मशहम नियाज (२८), जिआ अहमद जावेद अहमद (४८, रा. नमुना) आणि सुरेश राजगुरे (५०, रा. खोलापुरी गेट), असे हल्ल्यात जखमी झालेल्यांचे नाव आहेत. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी उमेश अशोक आठवले (३५), अंकुश सुभाषराव जिरापुरे (२५), भुऱ्या उर्फ नीलेश अशोक आठवले (२५), राजू मांडवे (२५) आणि शुभम तात्यासाहेब जवंजाळ (२२, सर्व रा. महाजनपुरा, अमरावती) या पाच जणांना अटक केली आहे.
रविवारी रात्री १० वाजताच्या दरम्यान तडीपार असलेला उमेश आठवले हा टांगापाडाव ते गांधी चौक मार्गावरील सुरेश राजगुरे यांच्या सावजी हॉटेलमध्ये जेवणासाठी गेला होता. या वेळी त्याने हॉटेलमध्ये जाऊन राजगुरेसोबत वाद घातला. तेव्हा उमेशने राजगुरेला मारण्यास सुरुवात केली. तसेच त्याने फोन करून त्याच्या सहकाऱ्यांना शस्त्रासह या हॉटेलमध्ये बोलावून घेतले. दरम्यान, याच हॉटेलला लागून तनवीर आलम, मुशीर आलम यांचे पॉपुलर ट्रान्सपोर्टचे कार्यालय आहे. या ठिकाणी तनवीर आलम, मुशीर आलम यांच्यासह त्यांचे तीन मित्र बसले होते. राजगुरे यांना मारहाण होत असल्याचे पाहून मुशीर हे वादात मध्यस्थी करण्यासाठी गेले होते. त्या वेळी उमेशने मुशीर यांनासुद्धा मारहाण केली. त्यामुळे मुशीर यांच्याच कार्यालयात बसले असलेले त्यांचे मित्र सावजी हॉटेलमध्ये गेले, त्याच वेळी उमेशचे चार सहकारी तलवारी, चाकू घेऊन आले. त्या पाच जणांनी हॉटेलमालक राजगुरेसह उर्वरित चौघांवर प्राणघातक हल्ला चढवला. यामध्ये मुशीर यांना गंभीर दुखापत झाली.

पोलिस आयुक्त बसले होते नियंत्रण कक्षात
रविवारीरात्री मुशीर चार जणांवर हल्ला झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस आयुक्तांनी घटनास्थळी भेट दिली. मध्यरात्री दोन वाजता पोलिस आयुक्त स्वत: नियंत्रण कक्षात बसले. त्यांनी सर्व ठाणेदारांनगस्त करण्याच्या सूचना दिल्या. सोमवारची रात्र संपूर्ण पोलिस आयुक्तालय जागी होते.