आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता वर्धा-यवतमाळ-नांदेड राष्ट्रीय रेल्वेमार्ग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- वर्धा-यवतमाळ-नांदेडया नव्या रेल्वेमार्गाच्या निर्मितीसाठी खासदार भावना गवळी यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हा राष्ट्रीय रेल्वेमार्ग प्रकल्प म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली आहे.

अकोला पूर्णा लोहमार्गाचे रूंदीकरण झाले. विदर्भ-मराठवाड्याच्या विकासाला चालना देण्यासाठी वर्धा-यवतमाळ-नांदेड हा नवीन राष्ट्रीय रेल्वेमार्ग प्रकल्प म्हणून घोषित करण्यासाठीसुध्दा खासदार भावना गवळी यांनी प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांनी ही महत्वपूर्ण बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. या रेल्वेमार्गाचे काम कसे असावे, यासोबतच संपूर्ण सविस्तर माहिती त्यांनी पंतप्रधानांना दिली. खासदार गवळी यांच्या निवेदनाची दखल घेत पंतप्रधानांनी घोषणा केली आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड या रेल्वेमार्गाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा मिळाल्यामुळे विदर्भ-मराठवाड्याच्या विकासासाठी मोठी उपलब्धी होणार आहे. अकोला-पूर्णा रेल्वेमार्ग रूंदीकरण झाल्याने नागपूर ते मुंबई, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, मराठवाडा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्याला दळणवळणाचे साधन म्हणून हा लोहमार्ग महत्वाची भूमिका बजावणार आहे. या रेल्वेमार्गाला राष्ट्रीय रेल्वेमार्ग प्रकल्प म्हणून मान्यता मिळाली असल्याने विदर्भातील काही जिल्ह्यांसोबतच मराठवाड्याच्या विकासात भर पडण्यास मोठी मदत होणार आहे. खासदार भावनाताई गवळी यांनी घेतलेल्या भूमिकेचे मतदारसंघात स्वागत होत आहे.

हे होतील फायदे
िवदर्भातीलकाही जिल्ह्यांसोबतच मराठवाड्याच्या विकासात पडणार भर
कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्याला दळणवळणाचे साधन म्हणून हा लोहमार्ग महत्वाची भूमिका बजावणार... तर आत्महत्याग्रस्त जिल्ह्याचा विकास : धडकरस्ते हे विकासाच्या नाड्या आहेत असे म्हणतात. मार्ग मग तो रेल्वेचा का असेना विकासासाठी महत्त्वाचा असतो. त्यामुळे वरिल रेल्वेमार्ग झाल्यास त्याचा फायदा नक्कीच शेतकरी आत्महत्यांमुळे त्रस असलेल्या यवतमाळ जिल्ह्याला मिळू शकतो.
दिशा विकासाची