आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लाचप्रकरणी परिविक्षाधीन पीएसआय एसीबीच्या जाळ्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अमरावती पोलिस आयुक्तालयातील खोलापुरी गेट पोलिस ठाण्याला कार्यरत असलेल्या एका परिविक्षाधीन उपनिरीक्षकाने शेळी चोरी प्रकरणात अटक केलेल्या आरोपीचा पीसीआर घेण्यासाठी लाचेची मागणी केली होती. सदर तक्रार एसीबीकडे केल्यानंतर एसीबीने पडताळणी केली. पडताळणीदरम्यान परिविक्षाधीन पीएसआयने रक्कम मागितल्याचे स्पष्ट झाल्यामुळे एसीबीने पीएसआयविरुद्ध लाच मागणीचा गुन्हा दाखल करून सोमवारी (दि. १४) उशिरा रात्री ताब्यात घेतले होते.

कपिल अंबिकाप्रसाद मिश्रा (३१) असे एसीबीने पकडलेल्या परिविक्षाधीन पीएसआयचे नाव आहे. मिश्रा सध्या परिविक्षाधीन पीएसआय असून, पोलिस स्टेशन खोलापुरी गेट येथे तैनातीला आहे. पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी शेळी चोरी प्रकरण दाखल झाले होते. या प्रकरणाचा तपास मिश्राकडे होता. या प्रकरणात एका चोरट्याला पोलिसांनी पकडले होते. त्या चोरट्याचा पीसीआर घेण्यासाठी मिश्राने हजार २०० रुपये तसेच प्रकरणात जप्तीची रक्कम हजार रुपये असे एकूण हजार २०० रुपये आरोपीच्या भावाकडे मार्चला मागितले होते. यासंदर्भात आरोपीच्या भावाने मार्चलाच एसीबीकडे तक्रार केली होती. तक्रार प्राप्त झाल्यानंतर मिश्राने लाचेची मागणी केली किंवा नाही, ही बाब एसीबीकडून पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान मिश्राने दोन हजार रुपये जप्तीचे हजार २०० रुपये लाच मागितल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळेच एसीबीच्या पथकाने मार्चलाच सापळा रचला होता. मात्र, मिश्राने त्या दिवशी आरोपीच्या भावाकडून रक्कम स्वीकारली नाही. त्यामुळे एसीबीच्या सापळ्यात मिश्रा अडकले नाही.

आपण रकमेसाठी फोन करणार असे त्या वेळी मिश्राने आरोपीच्या भावाला सांगितले. मात्र, त्यानंतर ते दिवस उलटले तरीही मिश्राकडून रक्कम मागण्यात आली नाही किंवा स्वीकारण्यात आली नाही. त्यामुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक राजेश मुळे यांनी खोलापुरी गेट ठाण्यातच कपिल मिश्राविरुद्ध लाचेची मागणी केल्याप्रकरणी तक्रार दिली गुन्हा दाखल केला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईमुळे शहर पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

पडताळणी दरम्यान केली मागणी
मिश्रा यांनी पडताळणी दरम्यान लाच मागितल्याचे पुढे आले होते. प्रत्यक्ष सापळा लावण्यात आला त्या वेळी त्यांनी तक्रारकर्त्याकडून रक्कम स्वीकारली नाही, मात्र पडताळणीदरम्यान मागणी केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध लाच मागितल्याचा गुन्हा दाखल करून सोमवारी रात्री अटक करण्यात आली. राजेश मुळे, पोलिस उपअधीक्षक, लाचलूचपत प्रतिबंधक विभाग,अमरावती.
बातम्या आणखी आहेत...