आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिऱ्यांवर पैलू पाडण्याचे अमरावती शहरामध्ये प्रशिक्षण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - हिऱ्यांवर पैलू पाडण्याचे प्रशिक्षण अमरावती दिले जात आहे. अधिकाधिक युवकांना प्रशिक्षित करीत शहरात डायमंड पार्क निर्माण करण्याच्या उद्देशाने हे प्रशिक्षण वर्ग चालवले जात आहेत. स्थानिक विदर्भ डायमंड इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून तीन एक महिन्यांचे प्रशिक्षण या अंतर्गत दिले जाते.

सुरत हे हिरा व्यापाराचे सर्वात मोठे केंद्र असून त्याप्रमाणे अमरावतीला देखील डायमंड हब निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहे. बडनेरा रोड शशिनगर स्थित संत गोरोबा काका सामाजिक भवनाच्या बाजूला विदर्भ डायमंड इस्टिट्युटच्या वतीने तीन एक महिन्याचे प्रशिक्षण वर्ग चालविले जात अाहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील युवकांना तीन महिन्यांचे तर अन्य संवर्गीय युवकांना एक महिन्यांचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. केंद्र शासनाच्या एकूण वार्षिक उत्पन्नात ४० टक्के वाटा विदेशी पैशाचा आहे. भारताच्या गंगाजळीत विदेशी मुद्रा आणण्याचे कार्य हिरा उद्योग करतो. हिऱ्यांवर पैलू पाडणाऱ्या कुशल कामगारांची संख्या फार कमी आहे. कारागिरांसाठी हे प्रशिक्षण अत्यंत महत्वाचे आहे. सर्व वयोगटातील नागरीक हे प्रशिक्षण नि:शुल्क घेऊ शकतात. याकरता पुणे बार्टी कडून ऑनलाइन अर्ज मागविले जातात. प्रकल्प अधिकारी म्हणून विश्वास शेरेकर कार्य पाहत असून सुरत येथून प्रशिक्षित राजेश अळसपुरे हे युवकांना प्रशिक्षण देतात.
तलिया मथाला कटींग
तीन एक महिन्यांच्या कालावधीत युवकांना तलीया किंवा मथाला कटिंगचे प्रशिक्षण दिले जाते. तलीया म्हणजेच बॉटम कटींग आणि मथाला म्हणजेच टॉप कटींग प्रशिक्षण.

निवास पुरस्कार
प्रशिक्षणासाठी निवड झाल्यानंतर निवासाची मोफत सुविधा आहेे. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत हिऱ्यावर पैलू पाडण्याचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...