आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदिवासी महिलेची गळा चिरून हत्या, धारणीपासून ७० किमीवर दादरा शिवारातील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धारणी - शेतात काम करीत असलेल्या एका २५ वर्षीय महिलेचा अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने गळा चिरून शिर धडावेगळे केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी (दि. २१) सकाळी १०.३० च्या सुमारास येथून ७० किमी अंतरावरील दादरा शिवारात घडली. चंपा ठाणसिंग चव्हाण असे मृतक महिलेचे नाव असून, तिला पहिल्या पतीपासून झालेले सात महिन्यांचे बाळ आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान, हत्या करणारा व्यक्ती हा चंपाचा पहिला पती असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला असून, त्याच्या शोधार्थ एक पथक मध्यप्रदेशात रवाना झाले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, सात महिन्यांच्या बाळाचे मातृछत्र हिरावल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
चंपाचे तीन महिन्यांपूर्वी ठाणसिंग चव्हाण याच्यासोबत दुसरे लग्न झाले . दरम्यान चंपाला पहिल्या पतीपासून सात महिन्यांचे एक बाळ आहे. पहिल्या पतीसोबत घटस्फोट झाल्यावर ठाणसिंगसोबत आदिवासी रितीरिवाजाप्रमाणे लग्न करून कामाच्या शोधात ते दादरा येथे आले. परिसरात एका शेतात रखवालदार म्हणून दोघेही पती-पत्नी काम करीत होते. गुरुवारी काही कामानिमित्त चंपाचा पती ठाणसिंग चव्हाण हा गावात गेला होता. बाळाला दूध पाजत चंपा ही शेतातील काम करीत होती. त्याच वेळी एका अज्ञात व्यक्तीने शेतात येऊन ितच्याशी वाद घातला. दरम्यान त्याने त्याच्याजवळील धारदार शस्त्राने चंपावर वार करत तिचे शिर धडावेगळे केले घटनास्थळावरून पळ काढला.

ठाणसिंग हा गावातून काम आटोपून शेतात परतल्यावर या घटनेचा उलगडा झाला. पतीने घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली. या खूनाची माहिती साहेबराव कामडे यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून चंपाचा मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवला असून, शुक्रवारी (दि. २२) तिचे शवविच्छेन हाेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय पोलिस अधिकारी शिवानंद तामगाडगे यांनी स्वत: जातीने लक्ष घालून आरोपीच्या अटकेसाठी पथक रवाना केले आहे. पुढील तपास एसडीपीओंच्या मार्गदर्शनाखाली पीआय शरद पाटील, मेजर तराड करत आहे.