आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव ट्रक गायींच्या कळपामध्ये शिरला, १६ गायींचा मृत्यू तर पाच गायी गंभीर जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुसद- भरधाववेगाने जात असलेला ट्रक गायीच्या कळपात शिरल्याने १६ गायींचा मृत्यू झाला तर पाच गायी गंभीर जखमी झाल्या. ही घटना पोफाळी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शिळोणा घाटात आज दि. २३ रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.

याबाबत सविस्तर असे की, आज गुरुवारी सकाळी पुसद तालुक्यातील शिळोणा येथील गायी चरण्यासाठी परिसरातील शेत शिवारात जात असताना नांदेडवरून येणाऱ्या खताचा भरधाव ट्रक क्रमांक एमएच-२६-एच-५५१६ गायीच्या कळपात शिरला. या गंभीर अपघातात १६ गायींचा जागीच मृत्यू झाला तर पाच गायी गंभीर जखमी झाल्या आहे. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणातील ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला असून ट्रक चालकाचा मुलगा शे. शाहीद शे. सय्यद वय १९ वर्ष याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुसद पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला असून ट्रक जप्त केला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहे.