आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाचा पाय मोडून आला कमरेजवळ तर दुसरा फेकला गेला 10 फूटावर, रिक्षाला ट्रकची धडक, 4 जण ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खामगाव (जि. बुलडाणा) - भरधाव ट्रक व ऑटोची समोरासमोर धडक हाेऊन झालेल्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले, तर सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी ११ वाजता खामगाव-अकोला महामार्गावर घडली. मृत बुलडाणा, साखरखेर्डा व भुसावळ येथील रहिवासी आहेत. अपघातातील जखमींना येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  
 
या अपघातात ऑटोमधील प्रवासी मजूर शेख आसिफ शेख रशीद (२६, रा. इकबालनगर, बुलडाणा) समाधान झिने (रा. साखरखेर्डा), भागाजी कांबळे (रा. साखरखेर्डा) आणि सागरसिंग फुलसिंग चितोडिया (२५, रा. भुसावळ) अशी मृतांची नावे अाहेत.बुधवारी सकाळी खामगावकडून ऑटो दहा मजुरांना घेऊन बाळापूरकडे जात होता. या वेळी हनुमान मंदिराजवळ ऑटोचालक  ट्रकला ओव्हरटेक करत असतानाच समोरून भरधाव येणाऱ्या ट्रकने आॅटोला धडक झाली. ही धडक एवढी जोरात  होती की, यात  ऑटोचा चक्काचूर होऊन चार जण जागीच ठार झाले. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करून ट्रक चालक सुरेश शंकरराव खोसे (रा. बाळापूर फैल) यास अटक केली.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... अपघाताची भीषणता दर्शवणारे फोटो
बातम्या आणखी आहेत...