आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रकची दुचाकीला धडक, अपघातानंतर नदीत पडला ट्रक, तीनघे गंभीर जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपघातानंतर नदीमध्ये कोसळलेला ट्रक. - Divya Marathi
अपघातानंतर नदीमध्ये कोसळलेला ट्रक.
घाटंजी- घाटंजीवरूनदोन किलोमीटर अंतरावर खापरी गावालगत वाघाडी नदिच्या पुलावर ट्रक दुचाकी यांचा अपघात झाला. यात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

नागपूरवरून घाटंजी मार्गे किनवट येथे विद्युत ताराचे बंडन घेऊन ट्रक क्र. एम.एच.२६ एच ७६१६ हा जात असताना शुभम देठे हा खापरी वरून कान्होबा टेकडीवर कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्याकरीता दुचाकीद्वारे जात होता. वाघाडी नदिच्या पुलावर सदर ट्रक आणि दुचाकी यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात शुभम हा गंभीररित्या जखमी झाला. नंतर या चालकाचे ट्रकवरून नियंत्रण सुटल्याने या पुलाला बाजूने कठडे नसल्याने ट्रक पुलावरून नदीत कोसळला. या अपघातात ट्रक चालक भगवान गणपत पाटील वय ५३ वर्ष रा. किनवट किल्नर रमेश महादेव आत्राम वय ४३ वर्ष रा. किनवट हे दोघेही गंभीर जखमी झाले असून या अपघातातील तिघांनाही उपचाराकरीता ग्रामीण रूग्णालय घाटंजी येथे आणण्यात आले. मात्र तिघांचीही परिस्थिती गंभीर झाल्याने तेथून त्यांना नागपूर येथे उपचाराकरीता हलवल्याचे कळते. ही अपघाताची माहिती कळताच घाटंजी पोलिस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. हा अपघात रात्री १०.३० वाजताचे दरम्यान घडला. गंभीर जखमी असलेल्या शुभमच्या आईने सकाळी घाटंजी पो.स्टे.ला तक्रार दिली असून घाटंजी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.