आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रकची एसटीला धडक; १ ठार,१६ प्रवासी जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतवाडा- भरधाव ट्रकने एसटी बसला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार तर,१६ प्रवाशी जखमी झाले. ही घटना परतवाडा-अमरावती मार्गावरील भुगांव फाट्याजवळ मंगळवारी रात्री ९.३० वाजता घडली. प्रवीण चिमोटे (३० रा. कविठा) असे मृतकाचे नाव आहे.

चंद्रपूर-परतवाडा बस (एमएच ४०/ वाय ५५२९) भुगाव फाट्याजवळ आली असता, अंजनगावकडून केळी घेऊन येणाऱ्या ट्रकने (एमएच ४०/ एके ११४०) एसटीला जबर धडक दिली. घटनेनंतर ट्रकचालक सुजित घियालाल पांडे (२९ रा. रा. उमरी रोड, नागपूर )याने ट्रकसह पसार झाला. ही धडक इतकी जबरदस्त होती की एसटीचा उजवीकडील संपूर्ण भाग कापल्या गेला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जखमींना शहरातील खासगी दवाखान्यांसह उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.जखमींमध्ये बसचालक प्रमोद दादाराव चांदुरकर (३८, घुग्गुस, चंद्रपूर)वाहक केशव नथ्थुजी लांडे (५३, कुठवाडा, चंद्रपूर), नीलेश काशीनाथ तायडे (२०,शहापूर, अंजनगांव सुर्जी), शे. निसार शे. हुसैन (३०, फरमानपुरा, अचलपूर), मेघा श्याम चौधरी (२८, बिलनपुरा), यश शंकर धुरजड (१२, बिलनपुरा), अर्चना सचिन तायडे(२७, पलासखेडी, चांदुरबाजार), शबिनाज शेख इब्रााहीम (२३, चंडीकापूर), सागर सुधाकर भुस्कटे(२३, हिरूळपुर्णा), गायत्री दिनेश पातुर्डे (लाखपूरी, मुर्तीजापूर), सिध्देश्वर बहाळे, प्रिती बहाळे, यशवंत बहाळे, आदींचा समावेश आहे. जखमी प्रवाशांच्या मदतीसाठी सरमसपुरा, अचलपूर, परतवाडा पोलिसांचे सहकार्य लाभले.दरम्यान, बसचालक प्रमोद चांदुरकर रा. घुग्गुस,चंद्रपूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ट्रकचालक सुजित पांडेविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अन् मृतक प्रवीणची ओळख पटली :
रात्रीझालेल्या अपघातात मृतक प्रवीणची ओळख पटली नव्हती. मात्र हातावर प्रवीण असे लिहले होते. सोशल मिडियाच्या माध्यमातून ठाणेदार नरेंद्र ठाकरे नरेंद्र जावरे यांनी ओळख पटविण्याचे आवाहन केले असता हा मृतक हा कविठा येथील असल्याचे निष्पन्न झाले. प्रवीण कृषी कंपनीचा विक्रेता होता.तो नागपूरवरून परतवाड्याकडे येत होता.
बातम्या आणखी आहेत...