आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रक कंटेनरचा अपघात, 1 ठार; महामार्गावरील अनभोरा गावाजवळ घडली दुर्घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूर्तिजापूर : अनभोरा गावाजवळ आज, शुक्रवार १६ जून रोजी दुपारी ट्रक कंटेनरच्या अपघातात एक जण ठार झाला. ही घटना महामार्गावरील अनभोरा गावाजवळ घडली आहे. याबाबत प्राप्त माहितीनुसार, अकोल्याकडून अमरावतीच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर(सीजी ०४ एलबी ८२१८) ने आपल्या समोरील वाहनाला ओव्हरटेक करून जाण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न फसला. त्यामुळे सदर कंटेनर अमरावतीकडून अकोल्याच्या दिशेने येणारा ट्रक(एमएच २७ ४८१८) ही दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला उतरली. या अपघातात ट्रकच्या चालकाच्या बाजुच्या समोरील भागाचा चुराडा झाला. ट्रक चालक अजहरअली गाजमअली रा. अमरावती यांचा जबर मार लागल्यामुळे मृत्यू झाला. कंटेनर चालक नानकसिंग सरबजीतसिंग रा. अमृतसर यास अटक केली असून, ठाणेदार एपीआय नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनात हेपोकॉ एस. पी. कळमकर महेश पिंजरकर पुढील तपास करत आहेत. महामार्गावरील चौपदरीकरणाच्याअभावी आणखी एका अपघाताची भर झाली आहे. 
 
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरकरणाचे कामाला मंजूरी मिळाली असताना त्यासाठी आजूबाजूचे वृक्ष तोडून ठेवले असताना अद्याप हे काम सुरू झालेले नाही. दुसरीकडे महामार्गावर वाहनांची वर्दळ जास्त राहत असल्याने नेहमीच अपघाताच्या घटना घडतात. त्यामध्ये अनेकाना जीव गमवावा लागलेला आहे. त्यामुळे रस्ता रूंदीकरण करणे गरजेचे झाले आहे. 
अपघातग्रस्त दोन्ही ट्रक असे रस्त्याखाली उतरले होते. 
बातम्या आणखी आहेत...