आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रकने दुचाकीस्वार दाम्पत्याला चिरडले, कोसदनी घाटातील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आर्णी - भरधावट्रक आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने यात दुचाकीवरील दाम्पत्य ठार झाले. ही घटना आज, दि. 6 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता तालुक्यातील कोसदनी घाटत घडली. धरमसिंग विष्णू जाधव वय ३० वर्ष, आणि त्याची पत्नी मंदा धरमसिंग जाधव वय २५ वर्ष, रा. अंबोडा, असे मृतकांचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नागपूरकडून नांदेडकडे जाणारा ट्रक क्रमांक एमएच २६- एच ६०४४ ने आर्णीकडे येणाऱ्या दुचाकी क्रमांक एमएच २९ जे- ३३१४ ची समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीस्वार धरमसिंग विष्णू जाधव वय ३० वर्ष, रा.अंबोडा हा जागीच ठार झाला. तर मागे बसून असेलेली त्यांची पत्नी मंदा धरमसिंग जाधव वय २५ ह्या गंभीर जखमी झाल्या. दरम्यान, महामार्ग पोलिसांना माहिती होताच त्यांनी लगेच घटनास्थळ गाठले. आणि जखमी अवस्थेत पडून असेलेल्या मंदाला तातडीने आर्णी येथे उपचारासाठी हलविले. मात्र, मंदा जाधव यांची प्रकृती अंत्यंत गंभीर असल्यामुळे त्यांना तातडीने यवतमाळ येथे हलविण्याचा सल्ला डॉक्टारांनी नातेवाईकांना दिला. दरम्यान, यवतमाळ येथे उपचारासाठी नेत असताना मंदा जाधव हीचा जवळा गावाजवळ पोहचताच मृत्यू झाला. पती-पत्नी दोघेही ठार झाल्यामुळे अंबोडा गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. अपघातात ठार झालेले पती-पत्नी हे आर्णी येथे बँकेच्या कामासाठी दुचाकीने जात होते. त्यांच्यावर कोसदनी घाटात काळाने झडप टाकली. कोसदनी घाटामध्ये यापूर्वीही मोठे अपघात झाले अाहेत. दरम्यान या अपघातप्रकरणी आरोपी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...