आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात १५ हजार हेक्टरवरील तुरीला थंडीचा फटका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - यंदा कडाक्याच्या थंडीमुळे जिल्ह्यातील एकूण लाख ३७ हजार हेक्टरपैकी १२ ते १५ हजार हेक्टर तुरीचे पिक प्रभावित झाले आहे. काही ठिकाणी तूर पूर्ण वाळली असून काही ठिकाणी रोग पडला आहे. या नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठवणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रपरिषदेत दिली. गतवर्षी तुरीला चांगला भाव मिळाल्याने जिल्ह्यात दरवर्षीपेक्षा दीप पटीने जास्त तुरीची पेरणी करण्यात आली.
 
परंतु, थंडीमुळे तुरीचे उत्पादन काही ठिकाणी चांगले झाले नाही. त्यामुळे मोर्चे काढण्यात आले, निवेदनं देण्यात आली. याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने तुरीचे सर्व्हेक्षण केले आहे. 
 
ज्यांनी पिक विमा काढला आहे, त्यांचा विमा कंपनीद्वारे सर्व्हे करण्यात आला. ज्यांनी काढला नाही, त्यांचाही अहवाल शासनाकडे पाठविला जाणार आहे. केंद्राच्या एप्रिलच्या पिकांसाठी दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या निकषांमध्ये कडाक्याची थंडी हा देखील एक निकष आहे. जर पिकाचे ३३ टक्क्यांच्या वर नुकसान झाल्यास ते मदतीसाठी पात्र ठरते असा निकष आहे.