आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई-नागपूर विमानात हवाई सुंदरींचा विनयभंग, प्रवाशाला नागपूरात अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - मुंबईहून नागपूरकडे निघालेल्या विमानात प्रवाशाने हवाई सुंदरींचा विनयभंग केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. याप्रकरणी मध्य प्रदेशातील बालाघाटच्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश गुप्ता (२३) याने मद्यप्राशन करून विमानात प्रवेश केल्याचे हवाई सुंदरीनेच तक्रारीत म्हटलेे. गोव्यात सुट्या घालवल्यावर तो शनिवारी सायंकाळी विमानाने नागपूरकडे येत  होता.  

दोन हवाई सुंदरी त्याला जेवण सर्व्ह करत असताना गुप्ताने दोघींचा हात पकडला. याबाबत त्यांनी विमानातील कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानंतरही गुप्ता याने त्यांच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला. विमानाचे कॅप्टन गोपालसिंह मोहनसिंह यांनी केंद्रीय अौद्योगिक सुरक्षा दलास या घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. 


पुढील स्लाइडवर वाचा... नशेत तर्रर्र आरोपीला नागपूरात अटक... 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...