आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती रेल्वे स्टेशनवर प्राणघातक हल्ला, सूरतचे दाम्पत्य जखमी; हल्लाखोर सख्खे भाऊ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- सूरतला राहणारे एक दाम्पत्य दोन ते तीन दिवसांपुर्वीच बडनेराला आले होते. सोमवारी (दि. १२) रात्री आठ वाजताच्या सुमारास बडनेरा रल्वे स्थानकावरील जुनीवस्तीच्या दिशेने असलेल्या तिकीटगृहाजवळ या दाम्पत्यावर नातेवाईकांनी प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यात पती -पत्नी गंभीर जखमी झाले असून जखमी महिलेला तातडीने नागपूरला हलविण्यात आले आहे. या प्रकरणी बडनेरा रेल्वे पोलिसांनी दोघांविरुध्द गुन्हे नोंदवून शोध सुरू केला आहे. 

अनिल शंकर भोसले (३०) आणि चांदणी अनिल भोसले (२५, दोघेही रा. सूरत, गुजरात) असे जखमी दाम्पत्याचे नाव आहे .तर हल्ला करणाऱ्यांचे नाव क्रिष्णा शंकर भोसले मछीन्द्र शंकर भोसले असे आहेत. हे दोघेही अनिल भोसलेचे भाऊ आहेत. अनिल भोसले त्याची पत्नी सूरतला राहतात. दोन दिवसांपुर्वी ते बडनेराला आले. संपुर्ण कुटूंब नाशिकला जाऊ, असे क्रिष्णा मच्छीन्द्र अनिलला म्हणत होते. मात्र नाशिकला येण्यासाठी अनिल त्यांची पत्नी चांदणी तयार नव्हते.
 
यातूनच सोमवारी रात्री त्यांची शाब्दीक वादावादी झाली. त्याचवेळी क्रिष्णा मच्छीन्द्र यांनी चाकू तसेच दारुची बॉटल मारून अनिल चांदणीला गंभीर जखमी केले. हल्ला केल्यानंतर दोघेही घटनास्थळावरून पसार झाले. दरम्यान रेल्वे पोलिसांनी तातडीने दोन्ही जखमींना तातडीने इर्विनमध्ये दाखल केले. चांदणीची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे इर्विनच्या डॉक्टरांनी तिला तातडीने नागपूरला पाठवले. सद्या चांदणीची प्रकृती स्थिर असल्याचे बडनेरा रेल्वे पोलिसांनी सांगितले. 

नागपूरसह गुजरातला पथक रवाना
कौटूंबिकवादातून दोन भावांनीच हा हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. त्यामुळे क्रिष्णा मच्छीन्द्र यांचा शोध घेण्यासाठी नागपूर गुजरातमध्ये पथक रवाना केले आहे. लवकरच हल्लेखोरांना अटक करण्यात येईल, असे तपास अधिकारी एपीआय पंकज चक्रे यांनी सांिगतले. 
बातम्या आणखी आहेत...